मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार भोंगे लावून हनुमान चालीसा लावायला सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. त्यावर मनसेचे पदाधिकारी अमेय खोपकर यांनी जहरी टीका केली आहे.
भोंग्यांवर ५ हजारांचा दंड
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावरून मशिदींवरील भोंगे खाली उतरावा, अन्यथा मशिदींच्या समोर दुप्पट भोंगे लावून हनुमान चालीसा लावा, असे म्हटले होते. त्यानुसार मुंबईत काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी भोंगे लावून हनुमान चालीसा लावायला सुरुवात केली. मात्र पोलिसांनी घाटकोपर येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर ५ हजार रुपयांचा दंड ठोठावून भोंगे जप्त केले, तसेच अन्य ठिकणाकडेही भोंगे लावण्यास मनाई केली. त्यामुळे हा विषय पुन्हा वाढला आहे. महाविकास आघाडी सरकार हिंदूंच्या विरोधात भूमिका घेत आहे, अशी टीका सुरु झाली आहे. शिवसेनाही आता हिंदुविरोधी भूमिका घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हनुमान चालीसाला विरोध आहे, पण नमाजाला पाठिंबा आहे, अशी टीका होऊ लागली. त्यातच आता मनसेचे पदाधिकारी महाविकास आघाडीवर टीका करू लागले आहेत.
(हेही वाचा मशिदींवरील भोंगे हटवा, ध्वनी प्रदूषण होतेय!)
काय म्हणाले खोपकर?
मनसे नेते अमेय खोपकर यांनी याविषयावर टीका करताना थेट शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा संदर्भ घेत राष्ट्रवादीलाही शिंगावर आहे. खोपकर म्हणाले,
मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते…! EDने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच कारवाई केली.
अशा प्रकारे खोपकर यांनी राऊत यांचे नाव न घेता सरकारवर जोरदार टीका केली.
मशिदीच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते…!
ED ने थेट राष्ट्रवादी च्या भोंग्यावरच कारवाई केली.
😝😝😝😝😝— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 6, 2022
Join Our WhatsApp Communityवळवळण्याऱ्या किड्या मुंग्याची उत्तर क्रिया करणार नऊ एप्रिल सायंकाळी साडेसहा वाजता ठाण्या मध्ये #उत्तरसभा
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 6, 2022