मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाढी वाढवली ते ठीक आहे, पण दाढीवाल्यांना मदत करणे चूक, असा खोचक टोला मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना लगावला. (MNS)
राज्य सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली असता ही घोषणा सध्या चांगलीच वादात सापडली आहे. या प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगले पण दाढीवाल्यांना मदत करणे योग्य नाही, असा टोला महाजन यांनी लगावला. (MNS)
(हेही वाचा – Worli BDD Chawl : दुसऱ्या टप्प्यातही म्हाडा देणार एकत्रित ११ महिन्यांचे भाडे)
वक्फ बोर्ड ही घटनाबाह्य संस्था आहे. या देशाचे कायदे वक्फ बोर्डाला लागू होत नाहीत म्हणून ते रद्द केले पाहिजे. वक्फ बोर्डाने जर एखाद्या जमिनीवर दावा सांगितला तर त्या संबंधित व्यक्तीला न्यायालयात जाता येत नाही, वक्फ बोर्डाकडे जावे लागते. नरेंद्र मोदी यांना जनतेने लोकसभेला पुरेसं पाठबळ दिले नाही. नाहीतर हा वक्फ बोर्डच रद्द करण्यात आला असता, असे प्रकाश महाजन म्हणाले. (MNS)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community