Nawab Malik प्रकरणात मनसेची उडी; ट्विट करून व्यक्त केली नाराजी

313
Nawab Malik प्रकरणात मनसेची उडी; ट्विट करून व्यक्त केली नाराजी

गुरुवार ७ डिसेंबरपासून नागपूर येथे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्ष उत्सुक तर विरोधी पक्ष काहीसे कमी आक्रमक जाणवले. दरम्यान नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या भूमिकेमुळे सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

नवाब मालिकांच्या भूमिकेवरून गोंधळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर नवाब मलिक आपला पाठिंबा कोणाला देतात हा प्रश्न अनुत्तरित असतांना अधिवेशनाच्या (Nagpur Winter Session 2023) पहिल्या दिवशी नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अजित पवार गटाच्या बाजूने आपली उपस्थिती लावली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. मालिकांच्या या भूमिकेवर मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

देशद्रोहासारखे (Nawab Malik) गंभीर आरोप असलेल्या नवाब मलिकांना महायुतीत घेणे योग्य होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून मांडली आहे. (Nagpur Winter Session 2023)

(हेही वाचा – Khopoli Drugs Case : तब्बल १०७ कोटींचे ड्रग्ज जप्त; तिघांना अटक)

फडणवीसांच्या या पत्रावर मात्र आता सर्वच विरोधी पक्ष टीका करत आहेत. अशातच आता या प्रकरणात मनसेनी (MNS) उडी घेतली असून फडणवीसांवर टीका केली आहे. मनसे पक्षाकडून X वर एक ट्विट करण्यात आले आहे. त्यामधून त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

मनसेची टीका

इतका स्नेह संबंध आहे तर पत्र का लिहावं लागतं ? सुहास्य वदन दाखवण्याची ही कोणती धडपड ? (MNS) ‘नवाब’चा ‘जवाब’ द्या की नका देऊ पण तुम्ही घातलेल्या राजकीय ढोंगीपणाच्या ‘नकाब’चा ‘जवाब’ मात्र तुम्हाला जनतेला द्यावाच लागेल नाहीतर जनता अगदी योग्यवेळी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवेल ! अशा शब्दांमध्ये मनसेने फडणवीसांवर टीका केली आहे.

(हेही वाचा – Mumbai Crime : मानखुर्दच्या अफसानाचा उच्च न्यायालयाच्या आवारात गोंधळ, पोलिसांवर हल्ला)

अधिवेशनाच्या (Nagpur Winter Session 2023) पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद दिसून आल्याने आता संपूर्ण अधिवेशनात कोणकोणत्या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.