गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या हार्दिक पांड्याच्या मुंबई संघातील पुनरागमनावर आता राजकीय पक्षाने देखील आपली विशेष टिप्पणी देण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने आपल्या नेहमीच्या शैलीत खास टिप्पणी केली आहे. (MNS)
मागील दोन हंगाम गुजरात टायटन्स संघाकडून खेळल्यानंतर संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आता पुन्हा एकदा त्याची जुनी फ्रँचाईजी मुंबई इंडियन्सकडे परतला आहे. मुंबई संघाने त्याला गुजरातकडून विकत घेतलं आहे. गुजरातकडून खेळताना हार्दिकने संघाच्या पहिल्याच आयपीएल हंगामात विजेतेपद मिळवून दिलं होतं. तर गेल्यावर्षी ते उपविजेते ठरले होते. खुद्द हार्दिकने गुजरात टायटन्ससाठी ३१ सामन्यांत ८३१ धावा केल्या.
(हेही वाचा – Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशी बोगद्यातील काम अंतिम टप्प्यात, कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न)
मात्र या हंगामासाठी हार्दिक पुन्हा एकदा मुंबई संघामध्ये परतला आहे. अशातच या सर्व घडामोडीवर आता मनसेने (MNS) सरकारला टोला लगावला आहे.
(हेही वाचा – Hardik Pandya : मुंबई इंडियन्समध्ये परतल्यावर हार्दिक पांड्याचा गुजरात संघ सहकाऱ्यांना भावपूर्ण संदेश )
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतले अनेक उद्योगधंदे गुजरातला हलवण्यात आले आहेत. तसेच मुंबई आणि महाराष्ट्रात येऊ घातलेले बरेचसे उद्योगधंदे गुजरातकडे गेले आहेत. या दोन्ही गोष्टींचा संदर्भ देत मनसेने (MNS) राज्य सरकारला टोला लगावला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) X वर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी स्वाभिमान लिलावात काढला नसता तर राज्यातून उद्योग पळवता आले नसते आणि मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उद्योगांचं ‘हार्दिक’ स्वागत करता आलं असतं. सैन्याला पुरेपूर रसद पुरवली आणि चिवटपणे बाजू लावून धरली तर गमावलेल्या गोष्टी पुन्हा कमावता येतात, त्यासाठी फक्त इच्छाशक्ती हवी. असो!’ अशा शब्दांत मनसेने (MNS) सरकारवर टीका केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community