भायखळा येथील राणीच्या बागेतील पेंग्विनवरील खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या पेंग्विनच्या विरोधात मनसे पुन्हा आक्रमक बनली आहे. मनसेने थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ वरळी येथेच बॅनर लावून शिवसेनेनेवर टीका केली आहे. तसेच ‘एव्हढा खर्च पेंग्विनना पोसण्यासाठी की पेंग्विन गॅंग ला पोसण्यासाठी?’, असा जळजळीत प्रश्न विचारला आहे.
पेंग्विनवरील किती झाला खर्च?
या बॅनरमध्ये पेंग्विनवरील खर्चाचा लेखाजोखा मांडला आहे.
- एक दिवसाचा पेंग्विनवरील खर्च २० हजार रुपये
- १ दिवसाचा ७ पेंग्विनवरील खर्च दीड लाख रुपये
- एक महिन्यांचा खर्च ६ लाख रुपये
- १ महिन्यासाठी ७ पेंग्विनवरील खर्च ४२ लाख
- १ वर्षाचा १ पेंग्विनवरील खर्च ७१ लाख
- १ वर्षांचा ७ पेंग्विनवरील खर्च ५ कोटी
- मागील ३ वर्षांचा ७ पेंग्विनवरील खर्च १५ कोटी रुपये
(हेही वाचा : अफगाणिस्तानचे नवे मंत्रिमंडळ दहशतवादीच! कोणता मंत्री किती मोठा दहशतवादी?)
पेंग्विनच्या देखभालीवर वाढता खर्च!
सध्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आग्रहामुळे मुंबई महापालिकेच्या राणीच्या बागेत पेंग्विन आणण्यात आले. मात्र अतिशीतल वातावरणात राहणारे पेंग्विन मुंबईच्या वातावरणात जिवंत राहू शकत नाही, म्हणून त्यांच्यासाठी अतिशीतल प्रदेशाप्रमाणे थंड वातावरण निर्माण करण्यात आले आहे. तसेच त्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे, त्यांच्या देखभालीसाठी कंत्राटदार नेमला आहे. मनसेचा याला आधीपासून विरोध होता.
Join Our WhatsApp Community