भाजप खासदार बृजभूषण सिंहांविरोधात दादर पोलीस स्थानकात मनसेने तक्रार दाखल केली आहे. उत्तरप्रदेशचे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.
( हेही वाचा : ‘तारीख ठरली’ राज्यात १५ हजार जागांसाठी पोलीस भरती!)
मनसेने दाखल केली तक्रार!
बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या बद्दल खालच्या भाषेत केलेल्या वक्तव्यावरून मनसेने ही तक्रार दाखल केली आहे. दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणं आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत ही तक्रार देण्यात आली आहे. यावेळी मनसेचे जनहित कक्षाचे वकील अँड गजणे, अँड रवी पाष्टे, उपविभाग अध्यक्ष शशांक नागवेकर आदी पोलीस ठाण्यात उपस्थित होते. हा गुन्हा नोंद झाल्यास बृजभूषण सिंह यांच्यावरील हा महाराष्ट्रातील पहिला गुन्हा ठरेल.
दरम्यान, मी राज ठाकरेंना २००८ पासून शोधतोय. जर ते कधी मला एअरपोर्टवर वैगरे भेटले तर नक्कीच त्यांना हिसका दाखवीन, असे बृजभूषण म्हणाले. तसेच उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल जोपर्यंत ते माफी मागणार नाही, तोवर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशाराही बृजभूषण यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community