राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आगामी महापालिका आणि 2024 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. त्यातच आता मनसेही लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या इंजिनात इंधन भरण्यासाठी कामाला लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेतील नेते आणि सरचिटणीस यांची एक बैठक घेतली. या बैठकीनंतर मनसेने विविध लोकसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक नेमले आहेत. यामध्ये पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
निरीक्षक म्हणून नेमणूक
मनसेने पुणे ग्रामीण भागातील मावळ,शिरुर आणि बारामती लोकसभेसाठी पुण्यातील नेत्यांना जबाबदा-या दिल्या आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी किशोर शिंदे,हेमंत संभूस,गणेश सातपुते यांची तर शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी अजय शिंदे,बाळा शेडगे आणि बारामतीसाठी वसंत मोरे,सुधीर पाटसकर आणि रणजित शिरोळे यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या सहीचे पत्रक जारी करत मनसेने या नव्या नेमणूका केल्या आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पुणे ग्रामीण – मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाच्या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. #MNSAdhikrut pic.twitter.com/56bRWkAAUe
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 22, 2022
मोठी जबाबदारी
वसंत मोरे हे मनसेचे कात्रज येथील नगरसेवक आहेत. अलीकडेच वसंत मोरे यांची पक्षाने पुणए शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करत त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नेमणूक केली होती. त्यामुळे पुणे मनसेतील काही लोकांबाबत वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची समजूत काढल्यानंतर आता वसंत मोरे यांच्यावर मनसेने ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
Join Our WhatsApp Community