आव्हान देताय? आता राज ठाकरेंचा आदेश येताच… पीएफआयला मनसेचं प्रत्युत्तर

147

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचे अल्टिमेटम दिले आहे. त्यावरुन आता अनेक आरोप-प्रत्यारोप होत असताना, मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने मनसेला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. याला मनसेने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत उत्तर दिले आहे. आम्हाला कोणी आव्हान देत असेल, तर राज ठाकरे आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही देखील ताकदीने प्रत्युत्तर देऊ, अशा शब्दांत मनसेने पीएफआयला इशारा दिला आहे.

राज ठाकरे आम्हाला आदेश देतील मग…

गल्ली बोळातले लोक म्हणजे काय संघटना होत नाही. 3 तारखेनंतर कोण कोणाला सोडतं आणि कोण कोणाला झोडतं ते बघू. हा महाराष्ट्र आहे ही मुंबई आहे. त्यांनी आम्हाला अल्टिमेटम दिलं आहे ना, राज ठाकरे आम्हाला आदेश देतील त्यानुसार काय करायचं ते आम्ही ठरवू, अशा शब्दांत मनसेने पीएफआयला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

(हेही वाचाः ‘भोंग्यांना हात लावाल ना तर…’ आता या संघटनेचा मनसेला इशारा)

ताकदीने आणि जोरदार प्रत्युत्तर मिळेल

कोणत्याही धर्माला किंवा धर्माच्या प्रार्थनेला आमचा विरोध नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची राज्य सरकारने काटेकोरपणे अंमलबजावणी केली तर राज्यातील वातावरण बिघडणार नाही. राज्यातील मतांचं लांगुलचालन थांबायला हवं. कोणी जर ‘छेडेंगे तो छोडेंगे नही’, अशी भाषा करत आम्हाला आव्हान देत असेल, तर त्या आव्हानाला ताकदीने आणि जोरदार प्रत्युत्तर देण्यात येईल, असा थेट इशारा मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी पीएफआयला दिला आहे.

पीएफआयचा इशारा

राम नवमीच्या निमित्ताने विविध राज्यांत निर्माण झालेल्या अशांततेविरुद्ध पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(PFI)ही मुस्लिम संघटना आक्रमक झाली आहे. मुंब्रा येथील या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मनसेला इशारा दिला आहे. छेडेंगे तो छोडेंगे नही, असे म्हणत एकाही मशिदीवरील भोंग्याला हात लावाल तर जशास तसे उत्तर देऊ, अशा शब्दांत पीएफआयचे नेते अब्दुल मतीन शेखानी यांनी निषेध व्यक्त केला आहे. या आंदोलनानंर त्यांनी मुंब्रा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण कडलक यांना एक निवेदन देखील दिले आहे.

(हेही वाचाः राष्ट्रवादीची हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी, मुसलमान प्रसाद खाऊन सोडणार रोजा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.