पुण्यातील सारसबागेत चक्क नामजपठण! मनसेने थोपटले दंड

232
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विषयावर आक्षेप घेत मशिदींवरील भोंगे खाली उतरावा अन्यथा मशिदींसमोर दुप्पट क्षमतेने भोंगे लावून हनुमान चालीसा वाजवा असे आव्हान केले होते. त्यामुळे आता या विषयावर मनसेने राज्य पातळीवर आंदोलन हाती घेतले असताना पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या सारसबागेत मुसलमान नमाज पठण करत असल्याचे दिसून आले. त्याला मनसेने आक्षेप घेतला आहे. मुसलमान सारसबागेत नमाज पठाण करत  असल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर खळबळ माजली.
mns 3
pune 1

पोलिसांकडे तक्रार 

सारसबाग येथील परिसरात काही धर्मांध नमाजपठण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसारित झाला. या व्हिडिओवरून मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष आशिष देवधर आणि अन्य पदाधिकारी यांनी मिळून १२ मे या दिवशी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सारसबाग येथील तळ्याचा गणपति मंदिर पेशवेकालीन हिंदू मंदिर आहे. याच सारसबागेत काही मुसलमान युवक नमाजपठण करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाले आहे. सारसबाग येथून २०० मीटर अंतरावर आदमबाग मशीद आहे. त्यासह पर्वती पायथा, स्वारगेट या भागांतही मशिदी आहेत. संबंधितांनी तेथे जाऊन मोकळेपणाने, पाहिजे तितक्या वेळ प्रार्थना करावी. या प्रकरणी हिंदूंच्या भावना दुखावल्या असून, तसेच सार्वजनिक ठिकाणी धार्मिक प्रार्थना करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे वाटते. प्रशासनाने ‘सारसबागेत प्रार्थना करू नये’, अशी सार्वजनिक सूचना तातडीने करावी. गणेश मंदिर परिसरात जाणीवपूर्वक नमाजपठण करणे, याविषयी प्रशासनाने ‘लांगूलचालन’ न करता या व्हिडिओची कायदेशीर पडताळणी करून या प्रकरणात जे तरुण आढळून येतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि भविष्यात त्या परिसरात धार्मिक प्रार्थना करू नये, अशी मागणी मनसेने केली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.