दिवाळीला ईदच्या शुभेच्छा दिल्याच नाहीत! मनसेचा दावा 

काही लोकांच्या डोळ्यांमध्ये आमचा हा दीपोत्सव आणि रोषणाई खुपत आहे. त्यांची पोटदुखी होत आहे, म्हणून हे मुद्दामहून केले गेले आहे, असे मनसेच्या पदाधिका-यांनी म्हटले आहे.

61

मुळात दिवाळी अजून चालूही झाली नाही, मनसेने शिवाजी पार्कात सगळीकडे रोषणाई केली आहे. त्याची चाचणी सुरु असताना कुणाला तरी त्या लाईटिंगमधून ईदच्या शुभेच्छा दिल्याचे आढळून आले आणि त्यांनी खोडसाळपणे व्हिडिओ तयार केला. त्यांना आम्ही हेच सांगतो इच्छितो की, त्यावेळी लाइटिंग लावण्याचे काम सुरु होते, चाचणी सुरु होती, ती सेटिंग बदलणे बाकी होते. त्यामुळे दिवाळीला ईदच्या शुभेच्छा देण्याचा विषयच उद्भवत नाही, असा खुलासा मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातूनच केला आहे.

काय म्हणाले मनसेचे पदाधिकारी? 

कालपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, शिवाजी पार्क येथे दीपोत्सव सुरु आहे, त्यामध्ये ईद-ए-मिलाद अशा लाईट्स लावण्यात आलेल्या आहेत. हे साफ चुकीचे आहे. खरं तरं असा कोणताही प्रकार इथे झालेला नाही. हा व्हिडिओ कुणी कुठून मिळवला हे आम्हाला माहित नाही. आजपासून या दीपोत्सवाचे उद्घाटन झाले आहे. अधिकृतपणे आजपासून हा दीपोत्सव चालू झाला आहे. त्यामुळे आम्ही आव्हान करतो की, आजपासून शिवाजी पार्कात असा प्रकार कुठे आढळून  आला तर तो आपल्याला दाखवून द्यावा आणि बक्षीस घेऊन जावे. काल लाईट लावल्यावर त्याची टेस्टिंग सुरु होती. त्यावेळी त्याची सेटिंग केली जात होती, हि सेटिंग, प्रोगामिंग मोबाईलने करत असताना जर कुणाला तो व्हिडिओ मिळाला असेल तर त्यातून कुणी गैरसमज करून घेऊ नये. त्या लाईट्समध्ये ‘हॅपी दिवाळी’, ‘हॅपी ख्रिसमस’, हॅपी न्यू इयर’, ‘हॅपी ईद-ए-मिलाद’ या सगळ्यांचा प्रोग्राम फिट केलेला असतो. त्यामध्ये आपल्याला हवे ते सेट करायचे असते. त्याप्रमाणे सेटिंग चालू असताना जर कुणी मुद्दाम खोडसाळपणे हा व्हिडिओ काढला असेल, तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे. आमचा तसा उद्देश नव्हता. काही लोकांच्या डोळ्यांमध्ये आमचा हा दीपोत्सव आणि रोषणाई खुपत आहे. त्यांची पोटदुखी होत आहे, म्हणून हे मुद्दामहून केले गेले आहे.

(हेही वाचा : शिवाजी पार्कात दिवाळीनिमित्ताने चक्क ईदच्या शुभेच्छा!)

काय घडले होते? 

शिवाजी पार्क येथे आधीच शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदार निधीतून कायमस्वरूपाची दिव्यांची रोषणाई केली आहे. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी मनसेने इथे यंदा काकणभर जास्तच दिव्यांची रोषणाई केली आहे. हे करताना मनसेने झाडांवरून विद्युत दिव्यांच्या माळा खाली सोडल्या आहेत. त्यामधून एखाद्या चलचित्राप्रमाणे वाचता येतील, अशा प्रकारे दीपावलीच्या शुभेच्छा देण्याची संकल्पनाही अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यात अक्षरे मात्र दीपावलीऐवजी ईदच्या शुभेच्छा देणारी दिसत होती. बघता बघता याचा व्हिडिओ बनवण्यात आला आणि चक्क तो सोशल मीडियात व्हायरल झाला. ही संकल्पना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची असल्याने साहजिकच यामुळे मनसे सर्वसामान्यांच्या टीकेची धनी बनली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.