‘हलाल’ अन्नपदार्थ बंद करा, अन्यथा ‘झटका’ देऊ…; मनसेचा मॅकडोनाल्ड्सला इशारा

164

हलाल पद्धतीचे अन्नपदार्थ ग्राहकांवर लादणाऱ्या मॅकडोनाल्ड्सविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, येत्या ९० दिवसांत झटका पद्धतीचे मांस आणि अन्नपदार्थ उपलब्ध करून न दिल्यास मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा देण्यात आला आहे.

( हेही वाचा : हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे वाशी आणि पनवेल येथे ‘हलाल मुक्त दिवाळी’ आंदोलन!)

महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी मॅकडोनाल्ड्स इंडियाच्या अधिकार्‍यांची भेट घेतली. अभय मुणगेकर, सिद्धांत मोहिते यांच्यासह मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

मुस्लिम धर्मियांमध्ये हलाल पद्धतीचे मांस आणि अन्नपदार्थ खाल्ले जातात. परंतु, हिंदूंसह इतर धर्मीय झटका पद्धतीचे मांस खातात. असे असताना, मॅकडोनाल्ड्स सरसकट सगळ्याच ग्राहकांना हलाल पद्धतीचे अन्नपदार्थ वितरित करीत असल्याचे समोर आले आहे. परिणामी हिंदू, ख्रिश्चन, शीख आणि इतर गैर-मुस्लिम ग्राहकांवर हलाल पद्धतीचे अन्नपदार्थ लादले जात असून, मॅकडोनाल्ड्सकडून उघडपणे आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याची तक्रार मनसेने केली आहे.

९० दिवसांचा अल्टिमेटम

मुस्लिमांना हलाल मांस खायचे असेल, तर ते खाऊ शकतात. मात्र, हिंदूंना झटका पद्धतीचे मांस खाण्याचे स्वातंत्र्य दिले जाणे आवश्यक आहे. मॅकडोनाल्ड्स किंवा कोणीही गैर-मुस्लिमांवर ‘हलाल’ अन्न लादू नये. त्यांच्या आस्थापनांत फक्त हलाल मांस देऊन त्यांनी हिंदूंच्या भावनांचा अनादर केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांना झटका मांस त्यांच्या सर्व दुकानांवर उपलब्ध करून देण्यासाठी ९० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा हा मुद्दा मनसे स्टाईलमध्ये उचलून धरू, अशी प्रतिक्रिया मनसेच्या व्यापारी सेनेचे पदाधिकारी सिद्धांत मोहिते यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.