आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका आणि राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पक्षविस्ताराची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तिचाच एक भाग म्हणून राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या खांद्यावर नवनव्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. शनिवारी मनसेने महिला आघाडीची कार्यकारिणी जाहीर केली असून, त्यात चौघींना सरचिटणीस पदी नियुक्ती देण्यात आली आहे.
यांचा कार्यकारिणीत समावेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला सेना कार्यकारिणीत राज्यभरातील १९ जणींना स्थान देण्यात आले आहे. सुप्रिया दळवी, स्नेहल जाधव, सुचिता माने आणि दीपिका पवार यांच्या हाती राज्य सरचिटणीस पदाची धुरा देण्यात आली आहे. त्याशिवाय ग्रेसी सिंग उपाध्यक्ष (दक्षिण मुंबई), ऋतुजा परब उपाध्यक्ष (दक्षिण मध्य मुंबई), सुप्रिया पवार उपाध्यक्ष (उत्तर मुंबई), मिनल तुर्डे उपाध्यक्ष (उत्तर मध्य मुंबई), सुनिता चारी उपाध्यक्ष (उत्तर पश्चिम मुंबई), अनिषा माजगावकर उपाध्यक्ष (ईशान्य मुंबई), सुजाता शेट्टी उपाध्यक्ष (महिला योजना व धोरण), अलका टेकम उपाध्यक्ष (यवतमाळ), रेखा नगराळे उपाध्यक्ष (लातूर), सोनाली शिंदे उपाध्यक्ष (सातारा), वर्षा जगदाळे उपाध्यक्ष (बीड), सुजाता ढेरे उपाध्यक्ष (नाशिक), दीपिका पेडणेकर उपाध्यक्ष (डोंबिवली), चेतना रामचंद्रन उपाध्यक्ष (कल्याण पूर्व), उर्मिला तांबे उपाध्यक्ष (कल्याण पश्चिम) यांचा नव्या कार्यकारिणीत समावेश आहे.
एका वर्षासाठी नेमणूक
मनसेच्या महिला सेनेची ध्येय धोरणे व कार्यक्रम सर्वांनी वेळोवेळी, निष्ठेने राबवावेत. यामध्ये कोणतीही कुचराई अथवा तडजोड स्वीकारली जाणार नाही. आपण व आपल्या सहकाऱ्यांकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, उपरोक्त पदाधिकाऱ्यांची नेमणूक एका वर्षासाठी करण्यात आली असून, पदाचा कार्य अहवाल पाहून मुदतवाढीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देण्यात आली.
Join Our WhatsApp Community