वरुण सरदेसाईंना सरकारी भाचा घोषित केले आहे का? मनसेचा सरकारला सवाल

या सरकारी भाच्यासाठी त्यांनी आठ सवाल या पत्रातून केले आहेत.

97

युवा सेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसैनिकांनी मंगळवारी नारायण राणे यांच्या घराबाहेर आंदोलन केले. यावेळी कोरोना नियम पायदळी तुडवले गेले. यावरुनच आता मनसे आक्रमक झाली असून, मनविसेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी त्यांच्याविरोधात गृह विभागाला पत्र लिहिले आहे. कोरोनाचे सर्व नियम मोडून युवा सेनेचे पदाधिकारी शासकीय मेळावे आयोजित करत आहेत. तरीही युवा सेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्यावर कठोर कारवाई का केली जात नाही? त्यांना राज्य सरकारने शासकीय पाहुणा या धर्तीवर सरकारी भाचा घोषित केले आहे का? अशी टीका या पत्रातून करण्यात आली आहे. या सरकारी भाच्यासाठी त्यांनी आठ सवाल या पत्रातून केले आहेत.

मग इतरांवर कारवाई कशाला?

राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री वारंवार कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी नियम पाळण्याचे जनतेला आवाहन करत आहेत. पण सरकारमध्ये असलेल्या पक्षांचेच नेते जर या आदेशांना वाटाण्याच्या अक्षता दाखवत असतील, तर इतरांवर कारवाई करण्याचा अधिकार सरकारला उरतो का, असा सवाल अखिल चित्रे यांनी या पत्राद्वारे केला आहे.

(हेही वाचाः शिवसेनेच्या आंदोलनामुळे राज्याला झाले ‘हे’ फायदे… मनसेने दिली यादी)

मनसेने केले सवाल

  • तिसरी लाट किंवा डेल्टा प्लसची पूर्वकल्पना असतानाही तथाकथित युवानेता वरुण सरदेसाई मेळावे घेऊन महाराष्ट्रातील तरुणांना काय संदेश देऊ इच्छितात?
  • मराठी सण-समारंभ, सामाजिक कार्यक्रमांवर, जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर होणा-या आंदोलनांवर बंदी. पण ‘सरकारी भाचा’ कार्यकर्ता मेळावा कसा घेऊ शकतो?
  • सरकारी आदेशांचं उल्लंघन केलं म्हणून वरुण सरदेसाई ह्यांच्यावर गुन्हा दाखल का होऊ नये?
  • जनतेने समाज माध्यमांतून आणि जाणकारांनी माध्यमांतून रोष व्यक्त करुनही जर मेळावे होणार असतील, तर सरदेसाई ह्यांच्याकडून बंधपत्र का लिहून घेऊ नये?
  • जनता निर्बंध पाळत नाही म्हणून आम्ही कडक लॉकडाऊन लावणार आणि ‘मी जबाबदार’ असं म्हणून जनतेवर कोरोना महासाथीचं खापर फोडणारं सरकार ‘सरकारी भाच्या’वर इतकं उदार का?
  • कुणी भ्रष्ट किंवा बेशिस्त वागत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज त्या व्यक्तीचा तात्काळ बंदोबस्त करत. मग अगदी आपल्या नातेसंबंधांतला का असेना… मग वारंवार शिवरायांचं नाव घेणारं हे सरकार ‘बेशिस्त भाच्याचा’ बंदोबस्त कधी करणार?

WhatsApp Image 2021 08 25 at 12.45.39 PM

(हेही वाचाः राडा संपता संपेना… भाजप आमदाराला धमकीचा फोन)

  • मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बसणारा हा ‘सरकारी भाचा’ कोरोना नियमांना किंबहुना सरकारलाच जुमानत नाही का
  • सरकारला नातेवाईकांमधून कुणी आवाहन देत आहे का?
  • राजकीय हेव्यादाव्यांसाठीही सरकारी भाच्याकडून आंदोलनं करताना गर्दी जमवली जाते, पोलिस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या भगिनींना अत्यंत घाणेरड्या आवेशात शिवीगाळ केली जाते. महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या तथाकथित युवा नेत्याला विशेष सवलत का?
  • असं असेल आणि सरकार ह्या अंतर्गत बेबंदशाही पुढे हतबल असेल तर आम्ही ह्या मोकाट भाच्यांच्या बेशिस्त वर्तवणुकीविरोधात न्यायालयीन लढाईसाठी सज्ज आहोत.

WhatsApp Image 2021 08 25 at 12.45.39 PM 1

असंही अखिल चित्रे यांनी गृह विभागाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

(हेही वाचाः आधीच ठरला राणेंच्या अटकेचा प्लॅन? हे आहेत खरे सूत्रधार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.