अवसरवादी ताई तुम्हाला काय उत्तर द्यायचे? दीपाली सय्यद यांना मनसेने सुनावले

127

सध्या शिवसेनेच्या पदाधिकारी, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उगारण्यास सुरुवात केली आहे. ‘राज ठाकरे यांना जर अयोध्येला जाण्याआधी उत्तर भारतीयांची माफी मागण्याची इच्छा नसेल, तर त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा हात पकडून अयोध्येत जावे’, अशी वारंवार टीका करत आहेत. त्यावर मनसे नेते अखिल चित्रे यांनी टीका दीपाली सय्यद यांच्यावर टीका केली आहे.

यावेळी अखिल चित्रे म्हणाले की, दीपालीताई तुम्हाला तुमचे साधे नाव माहीत नाही, शिवसेनेत आणि शिवसंग्राममध्ये निवडणूक लढवताना नाव बदलले, राजकारणासाठी तुम्ही नाव बदलता, तुम्ही अवसरवादी आहात, तुम्हाला तुमचे नक्की नाव काय हे माहीत नाही, मग तुम्हाला काय उत्तर द्यायचे, अशा शब्दांत मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी दीपाली सय्यद यांना सुनावले.

(हेही वाचा मनसेच्या विद्यार्थी सेनेची कार्यकारिणी जाहीर, सरचिटणीस पदी गजानन काळे, अखिल चित्रे)

व्हाईड बॉल म्हणून दुर्लक्ष करतो 

२०१४ साली अहमदनगर येथून तुम्ही निवडणूक लढवली तेव्हा तुम्ही तुमचे नाव ठेवले दीपाली सय्यद. २०१९ मध्ये शिवसेनेकडून मुंब्य्रातून निवडणूक लढवली तेव्हा नाव ठेवले सोफिया जहांगीर. शिवसंग्राममधून निवडणूक लढवताना  दीपाली सय्यद-भोसले नाव ठेवले. वारंवार राजकारणासाठी स्वतःचे नाव बदलणाऱ्या तुम्ही अवसरवादी ताई आहात. तुम्ही इतरांना बोलता, इतरांना नावे ठेवता, तरीही इतके दिवस आम्ही तुम्हाला व्हाईड बॉल म्हणून दुर्लक्ष करत होतो, वारंवार तुम्ही टीका करत असाल तर तुम्हाला उत्तर द्यायची वेळ आली आहे. तुम्ही आता महाराष्ट्राला तुमचे नेमके नाव काय, हे सांगावे. तुमचा २०१४ पासूनच आप ते शिवसंग्राम ते शिवसेना असा प्रवास आहे, तुम्ही विचारधारा बदलता तसे स्वतःचे नावही बदलता, आधी तुमच्या बदलणाऱ्या नावामागील कारण महाराष्ट्राला सांगा आणि नंतर शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांच्या गोष्टी करा, असेही अखिल चित्रे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.