या अनिलभाऊंची सुद्धा चौकशी करा… मनसेची राज्यपालांकडे मागणी!

शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्या राजकीय आशीर्वादामुळे मला अटक झाली आहे. त्यामुळे मंत्री परब यांचे सीडीआर तपासण्यात यावेत, अशी मागणी राज्यपालांकडे पत्राद्वारे केल्याचे चित्रे यांनी सांगितले.

102

राज्यात दररोज नव्या प्रकरणांची भर पडत आहे. सध्या हप्ता वसुलीच्या आरोपांमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार गोत्यात आले असताना, आता मनसेने देखील आरोपांच्या शर्यतीत उडी घेत राज्य सरकारवर एक नवा आरोप केला आहे. त्यामुळे आरोपांच्या भोव-यात सापडलेल्या महाविकास आघाडीच्या खात्यात आता, अजून एका आरोपाचा संचय झाला आहे. मनसे नेते अखिल चित्रे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहीत परिवहन मंत्री अनिल परब यांचे सीडीआर तपासण्याची मागणी केली आहे.

राज्यपालंकडे केली मागणी

वांद्रे खेरवाडीतील एका सोसायटीत चालणाऱ्या स्पा केंद्राला विरोध केल्याप्रकरणी पोलिसांनी मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्यासह दोघांना अटक केली होती. शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री अनिल परब, पोलिस उपायुक्त मंजुनाथ सिंगे आणि शैलेश पाटील यांच्या संगनमताने आमच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे या प्ररकरणी परब यांचा सीडीआर तपासावा, अशी मागणी मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी राज्यपालांकडे केली आहे.

(हेही वाचाः लवंगी की ‘अ‍ॅटम बॉंब’ लवकरच कळेल… फडणवीसांचं उत्तर की ‘धमकी’?)

काय आहे प्रकरण?

वांद्रे पश्चिमेकडील खेरवाडीतील गांधीनगर इमारतीत बेकायदेशीर स्पा केंद्र चालते. स्थानिकांचा या केंद्राला तीव्र विरोध आहे. स्थानिक प्राधिकरण आणि पोलिसांकडे याबाबत सातत्याने तक्रार करण्यात आली होती. पण अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट स्पा मालकाने २ जानेवारीला ३५ इमारतींचा वीज पुरवठा खंडीत करुन रहिवाशांना अंधारात टाकले. या प्रकरणी विद्यूत विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, शिवसेनेच्या नेत्यांकडून दमदाटी आणि धमकीचे फोन येऊ लागले. पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली. मात्र, संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी माझ्यासह दोघांना अटक केली, असा आरोप मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्या राजकीय आशीर्वादामुळे मला अटक झाली आहे. त्यामुळे मंत्री परब यांचे सीडीआर तपासण्यात यावेत, अशी मागणी राज्यपालांकडे पत्राद्वारे केल्याचे चित्रे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.