पाकिस्तानी कलाकार भारतीय चित्रपट किंवा मालिकांमध्ये दिसले तर मनसे स्टाईल खळ्ळखट्याक केला जाईल. असा थेट इशारा मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरांनी दिला आहे. शुक्रवार ३० जून रोजी ट्वीट करत त्यांनी ही सुचना वजा धमकी भारतीय चित्रपट आणि मालिका निर्मात्यांना दिली आहे. पाकिस्तानी खेळाडू आणि कलाकारांविरोधात मनसे सातत्याने खळ्ळखट्याकची भूमिका घेत असते. आताही भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान हे दोन्ही देश आमने-सामने येण्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने पुन्हा पाकिस्तानविरुद्ध खळ्ळखट्याकचा इशारा दिला आहे.
भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत पाक नाही हे ढळढळीत सत्य आहे. पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध भारतीयांचे बळी गेले. काहीजण हे विसरले असले तरी आम्ही विसरुच शकत नाही. म्हणूनच
फक्त खेळाडूच नाही तर पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम…— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 30, 2023
“पाकिस्तानने नेहमीच भारतात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानने केलेस्या दहशतवादी हल्ल्यांमुळे अनेक निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला आहे. काही लोक ही घृणास्पद कृत्ये विसरली असतील, पण आम्ही नाही.” अशा परखड शब्दांत अमेय खोपकरांनी ट्वीट केले आहे.
(हेही वाचा – Nagpur Crime : प्रेमाच्या त्रिकोणातून वाद; दिवसाढवळ्या तरुणाची हत्या)
पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडूंविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, “लक्षात ठेवा, आम्ही नेहमीच पाकिस्तानी खेळाडू आणि कलाकारांच्या विरोधात भूमिका घेतो आणि घेत राहू. जर कोणताही पाकिस्तानी अभिनेता भारतीय चित्रपट किंवा मालिकेत कोणीतीही भूमिका साकारत असल्याचे आढळले तर आम्ही त्यांना निश्चितच फटकारतो. अशा कृतींसाठी अशा चित्रपटांचे किंवा मालिकांचे निर्माते जबाबदार असतील.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community