‘मी काय राऊतांची रिप्लेसमेंट आहे का?’, अमित ठाकरेंचा टोला

70

सध्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील राज्यभर दौरा करत आहेत. मनसेच्या पुनर्बांधणीसाठी अमित ठाकरे राज्यातील मनसे पदाधिका-यांशी संवाद साधत आहेत. त्यातच शनिवारी त्यांनी पुणे पत्रकार संघ येथे मनसेच्या पदाधिका-यांची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी फारसा संवाद न साधणा-या अमित ठाकरे यांच्या एका उत्तराने मात्र हास्याची कारंजी उडाली.

अमित ठाकरेंचा टोला

अमित ठाकरे हे माध्यमांशी फारसे संवाद साधत नसल्यामुळे त्यांना एका कार्यकर्त्याने याबाबत विचारणा केली. यावेळी अमित ठाकरे यांनी अत्यंत मिश्कील उत्तर दिलं. ‘माध्यमांशी बोलायला संजय राऊत आहेत ना, ते सगळं पुरवतात’, असं उत्तर अमित ठाकरे यांनी दिलं. पण संजय राऊत हे सध्या तुरुंगात असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगताच, ‘तोपर्यंत मी काय राऊतांची रिप्लेसमेंट आहे का’, असा प्रश्न अमित ठाकरे यांनी विचारला. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार

दरम्यान, अमित ठाकरे हे राज्यभर दौरा करत ठिकठिकाणचे प्रश्न जाणून घेत आहेत. रोजगार, आरक्षण आणि स्पर्धा परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांना भेडसावणा-या समस्या दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचसाठी आपला हा दौरा असल्याचे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.