मनसे नेते अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात!

सोमवारी सकाळी ठाण्याचे मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाण्यात दहीहंडीसाठी मोठा स्टेज बांधला होता, तिथेच जाधव यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.

राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्यात प्रतिबंध केला आहे. मात्र सरकारचा हा आदेश धुडकावून दहीहंडी साजरी करणारच असा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी घेतला आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोना फक्त हिंदूंच्या सणांना का दिसतो? आम्ही कायद्याचे पालन करणारे आहोत. तुम्ही नियमावली द्या, त्याचे पालन करून आम्ही दहीहंडी साजरी करू. काहीही झाले तरी मनसे दहीहंडी साजरी करणारच!
– अविनाश जाधव, प्रमुख, ठाणे जिल्ह्याध्यक्ष

अविनाश जाधवांचे बेमुदत उपोषण! 

सोमवारी सकाळी ठाण्याचे मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाण्यात दहीहंडीसाठी मोठा स्टेज बांधला होता, तिथेच जाधव यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. त्यामुळे तिथे पोलिस आले आणि त्यांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले, तसेच स्टेज काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. काहीही झाले तरी दहीहंडी बांधणारच असे अविनाश जाधव म्हणाले. ठाकरे सरकारने राज्यातील दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा न करणायचा आदेश काढला आहे. मागील आठवड्यात दहीहंडी उत्सव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दहीहंडी साजरी करू नका, असा आदेश दिला. मात्र मनसे आणि भाजप यांनी त्याला विरोध केला आहे.

काय घडले ठाण्यात? 

आम्हाला दहीहंडी उत्सव नियमांचे पालन करुन साजरा करु द्यावा, अशी मनसेचे मागणी आहे. यासाठी सकाळपासूनच भगवती मैदानावर मनसेने तयारी सुरु केली. या मैदानामध्ये स्टेज उभारण्यात येत होता. मात्र सकाळपासूनच पोलिसांनी या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला. सव्वा अकराच्या सुमारास येथे पोलिसांच्या मोबाईल व्हॅन्स दाखल झाल्या आणि त्यानंतर जाधव यांच्यासहीत पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी राज ठाकरेंचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या, तसेच उद्धव ठाकरेंविरोधातही घोषणाबाजी झाली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here