मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुंब्र्यातील अनधिकृत मशीद, दर्गावर कारवाई केली नाहीतर त्याच्याबाजूला हनुमानाचे मंदीर उभारण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यानंतर सोमवारी, ठाणे पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ९ एप्रिलपर्यंत अविनाश जाधव यांना मुंब्रा शहरात प्रवेशबंदीची नोटीस बजावली आहे. या नोटीसीबाबत अविनाश जाधव यांनी पहिली प्रतिक्रिया देत या नोटीसीचे पालन करू, असे जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
‘आमचा एकही हिंदू आला नाही पुढे’
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, ‘माझ्याकडे सोमवारी रात्री ११ वाजता यासंदर्भात नोटीस आली आहे. मुंब्रा पोलिसांनी मला ९ एप्रिलपर्यंत मुंब्रा शहरात प्रवेशबंदी केली आहे. मला असे वाटते की, माझ्यावर बंदी घालण्यापेक्षा मी ज्या गोष्टी दाखवतोय, सतत एखादी अनधिकृत गोष्ट किंवा चुकीची गोष्ट दाखवली की धार्मिक रंग देऊन ती गोष्ट कशी काय लपवता येईल याचा प्रयत्न मुंब्र्यातल्या काही लोकांकडून केला जातोय. मी जे बोलतोय ते चुकीचो बोलतोय का? मी म्हटले, मुंब्रा देवी डोंगरावर ज्या काही अनाधिकृतपणे मशीद बांधल्या गेल्यात त्या चुकीच्या आहेत, त्याचे सर्वेक्षण करावे आणि कारवाई व्हावी. यात मी चुकीचे काय बोललो? मी हेही म्हटले, तिथे काही मंदिर असतील तर त्याचेही सर्वेक्षण करा आणि कारवाई करा. आमचा एकही हिंदू आला नाही पुढे. पण हे असे एकत्र झाले. जसे काय मी अख्खा मुंब्रा तोडायला सांगितला.’
आम्ही ज्या गोष्टीवर बोललोय ते अनाधिकृत आहे. मुंब्र्यातले जे कोणी सुशिक्षित तरुण असतील, ते ही या गोष्टीला मान्य करतील. या लोकांनी यांचे धंदे थाटले. याच्या मशीदमध्ये कोण असते? चर्सी, गर्दुल्ले हे लोक बसतात. तिथे काय देवाचा, धर्माचा प्रचार आणि प्रसार करणार तुम्ही? कुठल्याप्रकारच्या धर्माचा प्रचार करतायत तुम्ही?, असा सवाल जाधवांनी उपस्थितीत केला.
तसेच ते पुढे म्हणाले की, रमजानचा महिना सुरू आहे. त्यासाठी त्यांनी बंदी घातलेली आहे. पोलिसांची जी नोटीस आहे, त्याच मी पालन करतो. पण जे सांगतोय, ते झाले तर कायमस्वरुपाचा त्रास निघेल. कारण जरी तुम्ही मला टाळायचा प्रयत्न केलात, तरी आज ना उद्या कोणीतरी दुसरा काढणारच आहे. त्यावेळेला तुम्ही काय करणार आहात?
(हेही वाचा – नितीन गडकरी धमकी प्रकरण: आरोपी जयेश पुजारीचा ताबा मिळवण्यात नागपूर पोलिसांना यश)
Join Our WhatsApp Community