आम्हाला कोणीही अडवू शकत नाही, असे म्हणत राज ठाकरेंचा पठ्ठ्या अयोध्येत दाखल

162

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शविला होता. उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना आम्ही अयोध्येत पाऊल देखील ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला होता. दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरेंना हा अयोध्या दौरा स्थगित करावा लागला. अशातच एक वेगळीच बातमी समोर येत आहे.

आम्हाला कोणीही अडवू शकत नाही

मनसेचे ठाण्यातीस नेते अविनाश जाधव हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले आहे. अयोध्येत पोहोचल्यानंतर त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतल्याचे फेसबुक लाईव्ह करून ही माहिती दिली. आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. आम्ही ठरवल्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत ती गोष्ट पूर्ण करतोच. बृजभूषण सिंह यांचा कार्यक्रम होत असलेल्या ठिकाणीही आम्ही गेलो होतो, तसेच काही वेळापूर्वीच आम्ही रामलल्लाचे दर्शन घेतले आहे, असे वक्तव्य त्यांनी या फेसबुक लाईव्हमध्ये केल्याचे पाहायला मिळत आहे.

आजची तारीख पाच जून
सन्माननीय श्री राजसाहेब यांचा
अयोध्या दौरा होता काही कारणास्तव तो रद्द झाला पण
त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांनी तो पूर्ण केला
मराठी माणसाचा स्वाभिमान जपला

Posted by Avinash Jadhav MNS on Saturday, 4 June 2022

(हेही वाचा – Railway स्थानकातील झटपट तिकीट पंच करणारा ‘लाल डब्बा’ का झाला इतिहासजमा?)

मराठी माणसाला चँलेज करायचे नाही

५ जूनला राज ठाकरे हे अयोध्येत येणार होते, तेव्हा त्यांना रोखण्यासाठी बृजभूषण सिंह कार्यकर्त्यांना घेऊन अयोध्येत येणार होते. मनसेचे नेते आणि कार्यकर्ते अयोध्येत आल्यास आम्ही त्यांना शरयू नदीत बुडवू, असा इशाराही बृजभूषण सिंह यांनी दिला होता. मात्र, असे असतानाही ते आव्हान स्वीकारत अविनाश जाधव हे थेट अयोध्येत जाऊन पोहोचले. कोणीही मराठी माणसाला चँलेज करायचे नाही. आम्ही आलोय, आम्ही रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. आम्हाला धमक्या द्यायचे बंद करा. ज्यादिवशी राज ठाकरे आदेश देतील तेव्हा या सगळ्यांना यांची जागा आम्ही दाखवून देऊ, असे अविनाश जाधव यांनी म्हटले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.