तेव्हाच सोलून काढले पाहिजे; दंगलीवर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया

120

छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसलमानांनी दंगल केली. किराडपुरा भागातील राममंदिराजवळ मुसलमानांनी हा प्रकार केला. यावेळी काही तरुणांनी पोलिसांच्या वाहनांसह इतर खासगी गाड्यांना आग लावली. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. नामांतराचा मुद्दा घेऊन जेव्हा आंदोलनकर्त्यांनी औरंगजेबाचे फोटो झळकावले. तेव्हाच त्यांना सोलून काढायला हवे होते. तेव्हा कारवाई केली असती तर त्यांना जरब बसली असती. आता अॅक्शनची गरज आहे, असे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. याबाबतचे ट्वीट मनसेच्या अधिकृत अकाऊंटवरून करण्यात आले.

संबंधित ट्विटमध्ये बाळा नांदगावकर म्हणाले, छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आंनदास ठपका लावणारी घटना घडली. तिथे जमलेल्या जमावाने राम मंदिर परिसरात जोरदार दगडफेक केली. पोलिसांची १२ वाहने जाळण्याची यांची हिंमत झाली. हिंदू धर्मीय शांत जरी असले, तरी षंढ नक्कीच नाहीत. राज्य सरकार वारंवार सांगते की, हे हिंदुत्ववादी सरकार आहे. मग हिंदुंचे सरकार असूनही असे करण्याची हिंमत होते, कारण आपण नुसते बोलतो. आता अॅक्शनची गरज आहे. अलीकडेच नामांतराचा मुद्दा घेऊन या ‘शांतीदूतांनी ’त्या‘ औरंग्या’चे फोटो झळकावले. त्यांना तेव्हाच सोलून काढले असते तर त्यांच्यावर जरब बसली असती. आताही केवळ गुन्हे दाखल करून नव्हे तर, येथून पुढे असे करण्याची हिंमत होणार नाही, अशी जिरवली पाहिजे. पक्ष म्हणून जिथे जिथे हिंदू धर्मीय अडचणीत असेल, तिथे मनसे खंबीरपणे तुमच्याबरोबर असेल…” असे मनसेने जारी केलेल्या निवेदनात नांदगावकर म्हणाले.

(हेही वाचा कर्नाटकात मुसलमानांचे आरक्षण रद्द; बोम्मई सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचा निर्णय )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.