पुण्यातील राज ठाकरे यांच्या हाय व्होल्टेजला आता सुरुवात झाली आहे. या सभेत राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. पण आता याच सभेत मनसेचे पदाधिकारी गजानन काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यावेळी त्यांनी हिंदीतील एक शेअर सांगत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
‘नए नए मुख्यमंत्रीने अपने ड्रायव्हर से कहा, आज कार हम चलाएंगे. ड्राव्हरने कहा हम उतर जाएंगे आप कार चलाकर तो देखिए आपकी आत्मा हिल जाएगी, सरकार नहील जो भगवान के भरोसे चल जाएगी’,
असा शेर ऐकवत गजानन काळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला आहे. दोन वर्षांनंतर जे मुख्यमंत्री मंत्रालयात जातात असे मुख्यमंत्री जर आपल्याला वर्षानुवर्ष नको असतील, तर जनतेने त्याचा विचार करावा, असे गजानन काळे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः राज ठाकरेंच्या सभेआधी वसंत मोरेंच्या फेसबूक लाईव्हने खळबळ, म्हणाले…)
आम्ही हिंदुत्वाबद्दल बोलणार
या राज्यात राज्यातील जनतेचा नाही तर 100 कोटींचा घोटाळा करणा-या अनिल देशमुख यांचा विकास झाला आहे. डी गँगशी संबंध असणा-या नवाब मलिक यांचा विकास झाला आहे. 50 लाखांचं घड्याळवाल्या यशवंत जाधवांचा विकास झाल्याचे काळे म्हणाले. पण आम्ही हिंदुत्वाबद्दल बोलणार आणि आम्ही विकासावरुनही तुम्हाला प्रश्न विचारणार, असे थेट मत गजानन काळे यांनी व्यक्त केले आहे.
Join Our WhatsApp Community