शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर मनसेकडून पुन्हा एकदा जोरदार टीका करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारबाबत पुणे येथे केलेल्या विधानावरुन मनसेचे नेते गजानन काळे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. जर बाळासाहेब ठाकरे आज असते तर महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव आणणा-याच्या पेकाटात लाथ घातली असती, अशी टीका गजानन काळे यांनी केली आहे.
मविआचा प्रस्ताव बाळासाहेबांपुढे आला असता तर…
महाविकास आघाडी सरकार हे बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार असल्याचे विधान त्यांनी पुण्यात केले. ज्या बाळासाहेबांनी हिंदू,हिंदुत्व आणि मराठी हा ध्यास घेऊन शिवसेना पक्षाची स्थापना केली. मग ज्यांना हिंदुत्व आणि मराठी माणसाबाबत असुया आहे, अशा काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत बाळासाहेबांनी युती केली असती का?, महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव जर बाळासाहेबांपुढे आला असता तर तो आणणा-याच्या पेकाटात बाळासाहेबांनी लाथ घातली असती, अशी झणझणीत टीका गजानन काळे यांनी केली आहे.
(हेही वाचाः चित्रा वाघ म्हणाल्या, “अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणताय, एकट्यानेच तुम्हा तिघांचा …”)
राऊतांना स्मृतीभ्रंश झाला आहे
संजय राऊत यांना स्मृतीभ्रंश झाला आहे. त्यामुळे कोणत्या उद्देशाने बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली, याचा त्यांना विसर पडला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी आतातरी काँग्रेस-राष्ट्रवादीची लाचारी सोडावी आणि आपल्या शिवसैनिकांच्या मनात काय भावना आहेत हे जाणून घ्यावं, असंही काळे यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community