छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर जाण्यासाठी शिवसेनेने शेवटपर्यंत पाठिंबा दिला नाही. आता आपण राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा संभाजी राजे यांनी केली. त्यानंतर आता शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येत आहे. या भूमिकेमुळे आता मनसेकडून शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. खोटारडेपणा करणा-यांना आता पक्षाच्या नावात शिव वापरायची लायकी नसल्याची घणाघाती टीका मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केली आहे.
(हेही वाचाः मोदी म्हणाले, ‘मी फक्त एक ड्रोन पाठवतो आणि कोणाला कळायच्या आत…’)
बाळासाहेबांना अश्रू आवरले नसते
संभाजी राजे यांनी घतलेल्या पत्रकार परिषदेनंतर गजानन काळे यांनी ट्वीट करत शिवसेनेबाबत संताप व्यक्त केला आहे. छत्रपतींच्या वंशजाला दुःखी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणे वेदनादायक होते. उठता बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात “शिव” वापरायची लायकी नाही असेच म्हणावे लागेल. आदरणीय बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत, अशा शब्दांत काळे यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.
छत्रपतींच्या वंशजाला दुःखी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणे वेदनादायक होते
उठता बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात "शिव" वापरायची लायकी नाही असेच म्हणावे लागेल.
आदरणीय बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत.— Gajanan Kale (@MeGajananKale) May 27, 2022
माघार नाही, तर स्वाभिमान- संभाजी राजे
संभाजी राजे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत आपण राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द मोडल्याचे यावेळी संभाजी राजे यांनी सांगितले. ही माझी माघार नाही, तर माझा स्वाभिमान असल्याचे संभाजी राजे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः EPFO: या चुका झाल्या तर तुमचे PF अकाऊंट बंद होऊ शकते)
Join Our WhatsApp Community