सध्या राज्याच्या राजकारणात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना पाहायला मिळत आहे. शिवतीर्थावर होणा-या दसरा मेळाव्यावरुन ही रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही गटांनी महापालिकेकडे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यातच आता मनेसेने या वादात उडी घेतली आहे.
मनसे नेते गजानन काळे यांनी ट्वीट करत ठाकरे गटावर खोचक टीका केली आहे. मुंबई मनपा व राज्य सरकारने शिल्लक सेनेला शिवतीर्थावर टोमणे मेळावा घेण्यासाठी परवानगी द्यावी, महाराष्ट्राच्या जनेतला या मनोरंजनापासून वंचित ठेवू नये, असे म्हणत काळे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.
( हेही वाचा: ‘राष्ट्रवादी काँग्रेस बाळासाहेबांची शिवसेना संपवू पाहत आहे’, शेलारांची बोचरी टीका )
गजानन काळे यांचे ट्वीट
मनसे नेते गजानन काळे यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, मुंबई मनपा आणि राज्य सरकारने शिल्लकसेनेला शिवतीर्थावर टोमणे मेळावा घेण्यासाठी परवानगी देऊन टाकावी. खंजीर, मर्द मावळा, वाघनखे, गद्दार, निष्ठा यातून होणा-या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये. तसेही यावेळची स्क्रिप्ट बारामती वरुनच येणार आहे. अबू आझमी आणि असुद्दीन ओवेसी स्टेजवर असणार आहेत का? असे गजानन काळे म्हणाले आहेत.
Join Our WhatsApp Communityमुंबई मनपा व राज्यसरकारने शिल्लक सेनेला शिवतीर्थावर"टोमणे मेळावा"साठी परवानगी देवून टाकावी.आणि खंजीर,मर्द,मावळा,वाघनखं,गद्दार,निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये.
तसेही यावेळची स्क्रिप्ट बारामती वरून येणार आहे.
अबू आझमी व ओवेसी स्टेजवर असणार आहेत का ?— Gajanan Kale (@MeGajananKale) September 20, 2022