‘लॉटरीमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळालं म्हणून बारामतीच्या पोपटाने बरळू नये’, मनसेचा दानवेंना थेट इशारा

136

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर शिवसेना आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली. त्याला आता मनसेकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. दानवे हे बारामतीचे पोपट असून लॉटरीमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळाले म्हणून काहीही बरळू नका, असा थेट इशारा मनसे नेते गजानन काळे यांनी दिला आहे.

दानवे म्हणजे बारामतीचा पोपट

एकीकडे हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या पण दुसरीकडे अंबादास दानवे स्वतः औरंगजेबाची अवलाद असणा-या ओवैसींच्या नगरसेवकांच्या जीवावर निवडून येतात. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीची तळी उचलून स्वतःचा पक्ष संपवला असल्याची आठवण अंबादास दानवे यांना मी करुन देऊ इच्छितो.

(हेही वाचाः 7th Pay Commission: नवरात्रीतच सरकारी कर्मचा-यांची होणार दिवाळी? महागाई भत्ता वाढण्याची शक्यता)

त्यामुळे लॉटरीमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळालं म्हणून काहीही बरळू नका असा विनंतीवजा इशारा मी दानवे यांना देत आहे. बारामतीचा पोपट जर अशा पद्धतीने विरोधी पक्षनेता म्हणून बोलायला लागला तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत गजानन काळे यांनी अंबादास दानवे यांच्यावर केली आहे.

काय म्हणाले होते दानवे?

मनसेकडून मंगळवारी रविंद्र नाट्यमंदिरात पदाधिका-यांचा मेळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. शिवसेनेने विचार सोडल्यामुळे आज पक्षाची ही अवस्था झाल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यावरुन राज ठाकरे हे भाजपची तळी उचलण्याचं काम करत असून भाजप जशी स्क्रिपिट लिहून देते तसेच राज ठाकरे भाषणात बोलतात, अशी टीका अंबादास दानवे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.