मनसेला मोठा धक्का! राज ठाकरेंना पत्र लिहित बड्या नेत्याचा राजीनामा

241

महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मसल मॅन अशी ओळख असलेल्या मनिष धुरी यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन मोठा धक्का दिला आहे. अशा तडकाफडकी राजीनाम्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. तसेच याचा फटका देखील महापालिकेच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

‘या’ कारणामुळे मनिष धुरींचा राजीनामा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून मनिष धुरी यांनी रविवारी राजीनामा दिला. त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्याचे कारण पश्चिम उपनगरातील पक्षांतर्गत गटबाजी असल्याचे समोर येत आहे. पण मनिष धुरी यांनी पत्रात राज ठाकरे यांचे आभार मानत वैयक्तिक कारणामुळे सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. तसेच यापुढे राज ठाकरे यांचा समर्थक म्हणून काम करेल, इतर कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नसल्याचे मनिष धुरी यांनी पत्रातून स्पष्ट केले.

मनिष धुरी मनसेचे अंधेरी विभागाचे अध्यक्ष आहेत. तसेच भारतीय विद्यार्थी सेनेपासून ते राज ठाकरेंचे कट्टर समर्थक आहेत. पण आता धुरींच्या राजीनाम्यानंतर अंधेरी विभागाचे अध्यक्ष पद कोणाकडे जाणार? अशी चर्चा रंगली आहे.

(हेही वाचा – ज्याप्रमाणे शिवसेना संपली, त्याप्रमाणे आता राष्ट्रवादी संपेल; भाजप खासदाराचे मोठे विधान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.