‘गुरूची विद्या गुरूला?’ म्हणत ‘मनसे’चा उद्धव ठाकरेंवर निशाणा

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी सोमवारी निवडणूक झाली. या निवडणुकीच्या निकालात भाजपने पाच जागा भाजपने आणि पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. या निकालानंतर शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीचे वातावरण दिसून आले. यानंतर त्यांनी रातोरात आपला मुक्काम हलवला. ते नॉट रिचेबल झाल्यानंतर राज्यात राजकीय नाट्य रंगल्याचे चित्र आहे. अशातच राज्यातील या घडामोडीवर मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विट करून टिकास्त्र सोडले आहे.

‘Not Reachable’ असणार्‍या मुख्यमंत्र्यांना टोला

सरदेसाई यांनी ठाकरेंवर टीका करताना असे ट्विट केले की, नेहमीच ‘Not Reachable’ असणार्‍या मुख्यमंत्र्यांना त्यांचेच आमदार आता ‘Not Reachable’ असल्याचे समजतेय. थोडक्यात गुरूची विद्या गुरूला ? असे म्हणत त्यांनी खोचक टोला उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

(हेही वाचा – एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्यानंतर मनसेची पोस्ट, ‘लक्षात आहे ना?’)

राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.  शिंदे यांच्यासह १२ हून अधिक आमदार निकालानतंर रातोरात नॉटरिचेबल झाले आणि सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत तर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असलाचा दावा देखील केला जात आहे. मात्र एकनाथ शिंदेंनी एक ट्विट करत आपले स्पष्ट मत दिले आहे. दरम्यान, सकाळी मनसेचे एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते आहे.

कोणतं आहे व्हायरल होणारं ट्विट

दरम्यान, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी देखील एक ट्विट करून लक्षात आहे ना? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. या ट्विटमध्ये देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या पत्रातील शेवटचा मजकुराचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये, राज्य सरकारला माझं एकच सांगण आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणही सत्तेचा ताम्रपाट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे तुम्हीही नाही! असे पत्रामध्ये म्हटले आहे. या पत्राअखेरीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची स्वाक्षरी देखील दिसत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here