उद्योगपती गौतम अदानी भेटल्यावर राज ठाकरे थेट देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

153

श्रीमंतीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये असेलेले प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे अचानक मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी शिवतीर्थ येथे भेटीला आल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर लागलीच राज ठाकरे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सागर बंगल्यावर निघाल्यावर चर्चेला उधाण आले.

धारावी पुनर्विकास प्रकल्पावर चर्चा होणार 

देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. गौतम अदानी स्वत: राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले. तिथे त्यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीत धारावी पुनर्विकासविषयी चर्चा झाली, अशी माहिती समोर येते आहे. विशेष म्हणजे या भेटीनंतर आणखी महत्त्वाची घडामोड घडली. गौतम अदानी यांच्या भेटीनंतर अवघ्या तासाभरात राज ठाकरे हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी घरातून बाहेर पडले. राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या दोन बड्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा सुरु झाली, या विषयी अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहेत.

(हेही वाचा राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर उद्योगपती अदानी; चर्चेला उधाण )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.