महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई, ठाणे, औरंगाबाद नंतर आता पुण्यात होणार आहे. रविवार, २२ मे २०२२ रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे होणाऱ्या या सभेला पोलिसांनी मंजुरी दिली आहे, मात्र उशिरापर्यंत पोलिसांनी या सभेसाठी १३ अटी शर्थी घातल्या आहेत. त्यामुळे पुण्यातीलही राज ठाकरे यांची सभा अटी शर्थींने होणार आहे.
पुण्यातील सभेच्या आदल्या दिवशी राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत, शनिवारी, २१ मे रोजी राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन सभेच्या तयारीचा आढावा घेतला. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला पोलिसांनी फार उशिरा परवानगी दिली होती, त्याआधी मंत्रालयात बैठक झाली होती. त्यानंतर पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेसाठी १६ जाचक अटी लावल्या होत्या. ज्यातील १२ अटींचे उल्लंघन झाल्याचा अहवाल सभेनंतर पोलिसांनी राज्य सरकारला दिला, त्यावरून राज्य सरकारने राज ठाकरे यांच्यावर सर्वात गंभीर १५३ अ अंतर्गत नोटीस पाठवली, त्यामुळे जोरदार चर्चा सुरु झाली होती.
(हेही वाचा देशपांडे आणि धुरींवरील गुन्हा तथ्यहीन, न्यायालयाची पोलिसांनाच चपराक)
भोंग्यांच्या विषयावर पुढील दिशादर्शन करणार
आता पुण्यातही सभा होत आहे, या सभेलाही पोलिसांनी १२ विशेष अटी घातलेल्या आहेत. तरीही या सभेत राज ठाकरे जोरदार बॅटिंग करतील. यंदाच्या सभेत राज ठाकरे यांचा स्थगित झालेला अयोध्या दौरा हा प्रमुख मुद्दा असणार आहे, त्यासंदर्भात राज ठाकरे दौरा स्थगित होण्यामागील कारणे कार्यकर्त्यांना सांगणार आहेत. तसेच मागील दोन आठवड्यात ज्यांनी ज्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली, त्यांचा समाचार राज ठाकरे घेतीलच शिवाय भोंग्यांच्या विषयावर ते कार्यकर्त्यांना पुढील दिशा देतील, अशी शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community