राज ठाकरे भावुक… कार्यकर्त्यांच्या घरी पाठवले पत्र!

आपण एकत्र राहून या महामारीचा सामना करण्याची गरज आहे, असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, अनेकांनी या काळात आपल्या जवळच्या व्यक्ती गमावल्या आहेत. कोरोनाच्या संकटात अनेकांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना सांत्वन पत्र पाठवले आहे. कोरोना व्हायरसमुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या मनसे कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरे यांनी सांत्वन केले आहे.

विभाग अध्यक्षांवर जबाबदारी

स्थानिक मनसे नेते आणि कार्यकर्ते राज ठाकरे यांचे हे पत्र आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून त्यांना धीर देत आहेत. प्रत्येक विभाग अध्यक्षावर हे पत्र कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आपण धीराने या परिस्थितीचा सामना करुन खंबीप राहण्याची गरज आहे. आपण एकत्र राहून या महामारीचा सामना करण्याची गरज आहे, असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

(हेही वाचाः बीकेसी कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ! मनसेने केली मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी)

काय आहे राज ठाकरेंच्या पत्रात

आपल्या कुटुंबातील सदस्याच्या निधनाची दुःखद वार्ता समजली, अतिशय वाईट वाटले. आपल्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा किती मोठा डोंगर कोसळला असेल, याची कल्पना मी करु शकतो. इतक्या वर्षांचे आपले नाते क्षणार्धात अनंतात विलीन झाले हा धक्का मोठा आहे. त्याला धीरानेच तोंड द्यायला पाहिजे, असे राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या मनसे कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. पत्र लिहून त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देत त्यांचे सांत्वन केले आहे. कोरोना संकटात अनेकांनी आपले आप्तेष्ट गमावले. अशा प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन करणं शक्य नाही. सध्याची परिस्थिती दुःखाची आहे. मात्र या काळातही खंबीर रहा, असं राज ठाकरेंनी पत्रात आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

 

-यशवंत किल्लेदार, मनसे, विभाग अध्यक्ष

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here