मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक सूचक ट्वीट केले आहे. अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, वही बनेगा जो हकदार होगा, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे असून दोघेही हात जोडून अभिवादन करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरात घडलेल्या राजकीय भूकंपानंतर राज ठाकरे यांच्या फोटोसह संदीप देशपांडे यांनी केलेल्या या ट्वीटचे अनेक अर्थ आता काढले जात आहेत. मनसे आणि शिवसेना असा संघर्ष कायमच पाहायला मिळाला आहे. त्यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्वीटने चर्चांना उधाण आले आहे.
असे आहे संदीप देशपांडेंचे ट्वीट
संदीप देशपांडे यांनी अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा, असं म्हणत बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो ट्वीट केला आहे.
अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा pic.twitter.com/2QxhYD8OeR
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 25, 2022
राज ठाकरेंनी मनसे सोडण्याआधी उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख पद देण्यात आले होते. त्यानंतर आता 2019 च्या निवडणुकीत भाजपसोबत शिवसेनेचा झालेला सत्ता स्थापनेवरुनचा वाद, त्यानंतर काॅंग्रेस राष्ट्रवादी काॅंग्रेससोबत सरकार स्थापनेच्या वाटाघाटी आणि उद्धव ठाकरेंकडे चालून आलेले मुख्यमंत्री पद यावरुनही राजकाण रंगले होते.
( हेही वाचा: Maharashtra politics: निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार )
राजकीय बातम्यांना उधाण
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कौतुक करत, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अभिनंदनाचे पत्र लिहिले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यातच आता संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्वीटने राजकीय बातम्यांना उधाण आले आहे.
Join Our WhatsApp Community