मनसे नेते संदीप देशपांडेंवर मार्निंग वाॅक करताना हल्ला; रुग्णालयात दाखल

114

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. दादर येथील शिवाजी पार्कमध्ये माॅर्निंग वाॅक करत असताना त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञातांनी देशपांडे यांच्यावर स्टम्प आणि राॅडने हल्ला केला आहे. देशपांडे यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपाचर सुरु आहेत. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा संशय आहे. देशपांडे यांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगितले जात आहे. परंंतु या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या हात आणि पायाला मार लागला आहे.

( हेही वाचा: कसबा निवडणूक! केवळ मोदींवर अवलंबून कसं चालेल? )

संदीप देशपांडेंवर हल्ला झाल्यानंतर मनसे नेते संतोष धुरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संदीप देशपांडेवर झालेला हल्ला हा भ्याड हल्ला असल्याचे धुरी म्हणाले. सकाळी माॅर्निंग वाॅकवेळी हा हल्ला झाला आहे. माॅर्निंग वाॅकवेळी संदीप देशपांडे यांना एकट्याला पाहून चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी चेहरा पूर्ण झाकलेला होता. हा पूर्वनियोजित कट होता. क्रिकेट स्टम्पने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.