तोफ धडाडणार म्हणे, साधी लवंगी वाजली तरी पुरे; मनसेची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

82

मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज 8 जूनला विराट सभा होणार आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक चेतन कांबळे यांच्या जाहीरातीची औरंगाबादेत सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या जाहिरातीतून त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे भाजपनेही शिवसेनेविरोधात बॅनरबाजी सुरु केली आहे. यातच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उडी घेतली आहे.

मनसे नेते शिवसेनेवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. अगदी उद्धव ठाकरेंची सभा असो वा राज्य सरकारचा कारभार. यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे होणा-या सभेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे.

( हेही वाचा: राज्यसभा निवडणूक : आमदारांची ‘ट्रायडेंट’, ‘ताज’ मध्ये ‘सोय’! भाडे ऐकूण व्हाल थक्क )

देशपांडेंचा खोचक टोला

ट्वीट करत देशपांडे म्हणाले की, तत्वासाठी सत्तेवर लाथ मारणारे माननीय बाळासाहेब कुठे आणि एकी राज्यसभेसाठीच्या जागेसाठी एम आय एम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन. असो आज संभाजी नगरमध्ये तोफ धडाडणार असं म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे, असा खोचक टोलाही देशपांडे यांनी लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.