शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी घेण्याची मोहीम शिवसेनेकडून राबवली जात आहे. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट करत निशाणा साधला आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संदीप देशपांडे यांनी पोस्ट केलेल्या व्यंगचित्रामध्ये बाबा मला एक आयडीया सूचली आहे. आपण आता शिवसैनिकांना शिवबंधन आणि प्रतिज्ञापत्राऐवजी जीपीएस ट्रॅकरच बांधुया का? असा प्रश्न आदित्य ठाकरे हे आपल्या वडिलांना उद्धव ठाकरे यांना विचारताना दिसत आहेत.
असे आहे ट्वीट
या व्यंगचित्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसैनिकांनी दिलेले प्रतिज्ञापत्र आहे. दुसरीकडे टीव्ही सुरु आहे, ज्यात एकनाथ शिंदे हे आम्ही म्हणजेच खरी शिवसेना असा, दावा करताना दिसत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या हातात जीपीएस ट्रॅकर असून ते उद्धव ठाकरे यांना म्हणत आहेत की, बाबा मला एक आयडीया सूचली आहे. आपण शिवसैनिकांना शिबंधन आणि प्रतिज्ञापत्राऐवजी जीपीएस ट्रॅकरच बांधुयात का? असे ट्वीट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.
#idea pic.twitter.com/XK60p1IHFC
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 4, 2022
( हेही वाचा: अखेर एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी तर गोगावलेंची प्रतोद पदी निवड वैध )
शिवसैनिकांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार
शिवसेनेने झालेल्या बंडानंतर आता सावध पावले उचलली आहेत. शिवसैनिकांना तसेच शिवसेनेच्या पदाधिका-यांना एकनिष्ठतेचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. या प्रमाणपत्रामध्ये माझा ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर पूर्ण विश्वास आहे, असा मजकूर आहे. शिवसेनेचे आमदार, नगरसेवक, शिवसैनिक, पदाधिकारी अशा सर्वांकडूनच हे प्रमाणपत्र घेतले जाणार आहे. शिवसेनेच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली आहे.
Join Our WhatsApp Community