21 जून वर्षातला मोठा दिवस की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस?, मनसेची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेवर नाराज असून त्यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या आमदारांचा गट जर शिवसेनेतून बाहेर पडला, तर शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे. इतकंच नाही तर अल्पमतात आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारही कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता मनसेकडून आता शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

संदीप देशपांडे यांची टीका

21 जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस आहे. याच दिवशी शिवसेनेला जोरदार धक्का बसल्यामुळे आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी खोचक ट्वीट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 21 जून वर्षातला मोठा दिवस की, ‘वर्षा’तला शेवटचा दिवस, असे ट्वीट करत संदीप देशपांडे यांनी बोचरी टीका केली आहे.

(हेही वाचाः 48 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची एकनाथ शिंदे पुनरावृत्ती करणार? शिंदेंच्या ट्वीटमुळे खळबळ)

एकनाथ शिंदे नाराज

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. सोमवारी रात्रीच एकनाथ शिंदे हे सुरत येथे रवाना झाले असून, ते शिवसेनेसाठी Not Reachable झाले आहेत. नाराजीचं कारण अजून एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदारांचा गट असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

(हेही वाचाः असंतोषामुळे काँग्रेसही फुटीच्या उंबरठ्यावर? ज्येष्ठ काँग्रेस नेत्याची खदखद)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here