इतरांना रिक्षावाला, पानवाला म्हणणाऱ्या राऊतांचा ‘मनसे’ने सांगितला इतिहास

99

गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सध्या सत्ताबदलांचे वारे वाहतांना दिसत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सेनेविरोधात पुकारलेल्या बंडामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. यावर अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात, आरोप-प्रत्यारोप केलेत. अशातच आता या वादात मनसेने उडी घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे हे शिवसेना विशेषतः संदीप देशपांडे संजय राऊतांवर सातत्याने निशाणा साधत असतात.

(हेही वाचा – ‘मनसे’ अ‍ॅक्शन मोडमध्ये; विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर)

गेल्या काही दिवसांत राऊतांनी एकनाथ शिंदे गटावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील हे आधी पानटपरीवर बसायचे, आता कॅबिनेट मंत्री झालेत. आता पुन्हा ते पानटपरीवर बसतील असे ते म्हणाले होते. यावरच मनसेने राऊतांच्या कारकीर्दीवर भाष्य करणारे ट्वीट केले आहे. इतकेच नाही तर राऊतांना मनसेने इतिहासच सांगितला आहे.

काय केले देशपांडेंनी ट्विट

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मंगळवारी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटले की, दुसऱ्यांना रिक्षावाला, पान टपरी वाला, भाजी विकणारा, वॉचमन, म्हणण्याऱ्या लोकांनी हे विसरू नये ते स्वतः लोकप्रभामध्ये कारकून होते. तिथून उचलून राज ठाकरे यांनी तुम्हाला ‘सामना’चे संपादक बनवलं आहे, असे म्हणत राऊतांना चांगलाच टोला लगावला आहे.

विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यातील राजकारण दिवसेंदिवस वेगळ्या वळणावर जात आहे. यादरम्यान, राऊतांनी अनेक विधान केली. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका देखील केली. अशातच आता मनसेनेही राऊतांवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. जुन्या आठवणींचा पुरावा देत , इतिहास सांगून मनसेने राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राऊत आणि मनसे यांच्यातील वाद पुढे येणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.