Sandeep Deshpande : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची मनसे नेते संदीप देशपांडेंनी उडवली खिल्ली

153

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखतीवरून खिल्ली उडवली. देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात उद्धव ठाकरे यांचे पात्र देशपांडे यांनी स्वीकारले तर त्यांच्या एका मित्राने संजय राऊत यांचे पात्र स्विकारून अवघ्या दोन मिनिटांत या मुलाखतीचे अवलोकन करत विडंबन केले. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

संजय राऊत यांची भूमिका साकारणारे व्यक्ती : महाराष्ट्राचे माजी नंबर वन मुख्यमंत्र्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. ज्यांची ओळख करून द्यायची गरज नाही. फेसबूकच्या माध्यमातून जे तुमच्या कुटुंबाचे सदस्य बनले आहेत. मनपाचे करोडो रुपये खर्च केले. हजारो रुपये खर्च केले. पण रस्ते काही चांगले केले नाही. महाराष्ट्राचेच नव्हे तर जगाचे नंबर वन मुख्यमंत्री राहिले त्या साहेबांची आपण स्फोटक मुलाखत सुरू करूया.

(हेही वाचा Coal Scam : काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांना 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा)

उद्धव ठाकरेंची भूमिका स्वीकारत संदीप देशपांडे म्हणाले की, संजय सॉरी… संतोष मला घरी बसायलाच आवडते. शिवसेनाचा प्रमुख, शिवसेनाचा मुख्यमंत्री, वाघाची औलाद, अफजलखानाच्या फौजा, कोरोना, मास्क, सुरक्षित अंतर, कोमट पाणी, कपटी, मशाल आणि मी संकटात असलो की मराठी माणूस, औरंगजेब, खंजीर, खोके, मिंधेगट, गद्दार, मशाल आणि मुलाखत संपली किंबहुना मुलाखत संपलीच.

दुसरा व्यक्ती : तर पाहिले ना, हीच होती आजची ज्वलंत आणि स्फोटक मुलाखत… व्हिडिओच्या शेवटी महाराष्ट्राच्या माजी नंबर वन मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असे लिहून दोन मिनीटांचा व्हिडिओ संपतो.

सोशल मीडियावर व्हायरल

संदीप देशपांडे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर लोकांच्या कमेंट देखील मजेशीर असल्याचे पाहायला दिसून येत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.