“सगळा घरचाच मामला, अडीच वर्षे संपत्ती कमावली, आता सहानुभूती…” उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर ‘मनसे’ची प्रतिक्रिया

79

‘सामना’चे संपादक खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेतली असून त्याचा काही भाग प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीवर भाजप, एकनाथ शिंदे गट आणि मनसेकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहे. अशातच अडीच वर्षे उद्धव ठाकरे यांनी फक्त संपत्ती कमावली आता पुढील अडीच वर्षे त्यांना संपत्ती कमावायची आहे. असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून करण्यात आला आहे. यासह ते असेही म्हणाले की, ही कसली मुलाखत, आपलेच प्रश्न, आपलीच उत्तरं, सगळा घरचाच मामला आहे.

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मनसेची तिखट प्रतिक्रिया

अडीच वर्षे संपत्ती कमावली आता पुढची अडीच वर्षे सिंपथी कमवायची आहे. नियती ही तिचं चक्र पूर्ण करायची आहे. जी गोष्ट तुमच्यासोबत केली ती तुमच्याबाबतीत घडते. तुम्ही मसनेचे सहा नगरसेवक फोडले आज तुमचे आमदार फुटले. अमित ठाकरेंची तब्येत बरी नव्हती. राजसाहेब त्यात व्यस्त होते. त्यावेळेला सहा नगरसेवक फोडायचं पाप तुम्ही केलं. आज तीच गोष्टी तुमच्याबाबत घडतेय…. जे कर्माची फळं इथेच भोगायची आहेत. ते तुम्ही भोगत आहात, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

(हेही वाचा – तुम्ही SBI, HDFC, ICICI बँकेचे ग्राहक आहात? तर तुमच्यासाठी खुशखबर, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा)

ज्यावेळी मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेने फोडले तेव्हा शिवसैनिकांकडून सर्जिकल स्ट्राइक असा उल्लेख करण्यात आला होता. याबाबतीत शिवसेनेला सुनावताना देशपांडे म्हणाले की, मनसे फोडली तेव्हा शिवसेनेचे नेते सर्जिकल स्ट्राइक म्हणून शिवसेना बोंबा मारत होती. आता तुमचे आमदार फुटले तर सिंपथी पाहिजे का? बरं तुम्ही एका ठिकाणी म्हणताय, सन्माननीय बाळासाहेबांचं नाव कुणी वापरू नका…ते आमचे आहेत. मग त्यांच्याच स्मारकासाठी जेव्हा महापौर बंगला मागितला तेव्हा ते पूर्ण महाराष्ट्राचे होते ना… आता ते एकट्याचे कसे झाले? मुळात बाळासाहेब ठाकरे हा एक विचार आहे. विचारावर कोणाचाही मालकी हक्क नसतो. बाळासाहेब महाराष्ट्राचे काय देशाचे नेते होते. मग ते तुमच्या एकट्याचे कसे झाले. तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही त्याचे अर्थ बदलता का?

…आणि तेच तुमच्याबाबतीत घडलंय

पुढे आजच्या मुलाखतीवर त्यांना विचारणा करण्यात आल्यानंतर ते म्हणाले, आजची मुलाखत म्हणजे आपलेच प्रश्न आणि आपलीच मुलाखत. सगळा घरचाच मामला. त्यामुळे कोणाला खंजीर म्हणतील, पालापाचोळा म्हणतील, आता त्याचंही लोकांना अप्रुप राहिलेला नाही. पालापाचोळा अडीच वर्ष तुमच्याबरोबर होता. तेव्हा तो चांगाल होता. जे कर्म तुम्ही केलं, लोकांसोबत तुम्ही जे कपट केलं, तेच तुमच्याबाबतीत घडलंय.

कोणी केला बेस्ट मुख्यमंत्रीचा सर्वे?

कोरोनातील बेस्ट मुख्यमंत्री असं उद्धव ठाकरे म्हणवतात, पण हा सर्वे कुणी केलाय, असा सवाल संदीप देशपांडेंनी केला. ते म्हणाले, ‘ पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे सर्वोत्कृष्ट आहेत, असं म्हटलं जातं. हा सर्वे कोणत्या संस्थेने केला? त्याआधी त्यांनी कोणता सर्वे केला होता? त्या संस्थेने बेस्ट सीएमचा सर्वे केला. आपणच बोगस संस्था उभ्या करायच्या, आपणच स्वतःला बेस्ट म्हणून घ्यायचं. त्यानंतर या संस्थेने कोणताही सर्वे केला नाही. यापुरतंच ही संस्था तयार केली होती का? कोरोना काळात लोकांचे जे हाल झाले, रेल्वे प्रवाशासंदर्भात असतील, लोकांना बेड, अँब्युलन्स मिळाली नाही. तुम्ही घरात बसून होता, म्हणून महाराष्ट्राची वाट लागली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.