राऊतांचा अग्रलेख वाचा… मग तुमच्यातील ‘सय्यद’ बंड करेल, आता मनसेचे ‘रोखठोक’

124

गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शिवसेना कार्यकर्त्या दिपाली सय्यद जोरदार टीका करताना दिसत आहेत. सध्या राज ठाकरे हे पुणे दौ-यावर असून 21 मे रोजी त्यांची पुण्यात सभा होणार आहे. यावरुन सभा घ्यायच्याच असतील तर अयोध्येमध्ये घेऊन दाखवा, असे आव्हान दिपाली सय्यद यांनी दिले होते.

त्यानंतर आता मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आहे. राज ठाकरेंना फुकटचे सल्ले देण्यापेक्षा सामनावीरांचा अग्रलेख वाचा, मग तुमच्यातील सय्यद अचानक बंड करेल, असा टोला शालिनी ठाकरे यांनी लगावला आहे.

(हेही वाचाः पंकजाताईंनी महाविकास आघाडीची लेन्स लावावी, धनंजय मुंडेंची जाहीर कार्यक्रमात पंकजा मुंडेंना ऑफर)

शालिनी ठाकरे यांचं ट्वीट

राज ठाकरेंना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फुकटचे सल्ले देण्यापेक्षा ‘मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या’ असा अग्रलेख लिहिणाऱ्या ‘सामना’वीरांचा अग्रलेख वाचा. मग तुमच्यातील ‘सय्यद’ अचानक ‘बंड’ करेल किंबहुना त्याने तसं करायलाच हवं, अशा शब्दांत शालिनी ठाकरे यांनी दिपाली सय्यद यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

(हेही वाचाः हार्दिक पटेलचा काँग्रेसला ‘टाटा-बाय बाय’)

काय म्हणाल्या होत्या दिपाली सय्यद?

सभा करायच्याच असतील तर अयोध्येमध्ये करुन दाखवा, पुण्यात तर शिवसेनेचे नगरसेवक देखील सभा घेतात, तेही जास्त गर्दी करुन…अशा शब्दांत दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.