राज ठाकरेंच्या सभेआधी वसंत मोरेंच्या फेसबूक लाईव्हने खळबळ, म्हणाले…

179

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी सकाळी पुण्यात सभा होणार आहे. पण या सभेआधीच मनसेचे नेते वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा पुण्यातील मनसे नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे पुणे मनसेतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आले आहेत. पुण्यातील मनसेचे काही पार्ट टाईम नेते वसंत मोरेने बांधलेली टीम संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे वसंत मोरे यांनी आपल्या फेसबूक लाईव्हमध्ये म्हटले आहे.

इतकी घाई कोणाला होती?

वसंत मोरे यांनी शनिवारी मनसेच्या कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर फेसबूक लाईव्ह करत अनेक खुलासे केले आहेत. निलेश माझीरे आणि वसंत मोरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या. ही गोष्ट आमच्यासाठी देखील धक्कादायक होती. पुणे शहरात माथाडी कामगारांसाठी निलेश माझीरे यांनी फार मोठे कार्य केले होते. ते केवळ कार्डावरचे माथाडी कामगार अध्यक्ष राहिला नाही. पण तरीही निलेश माझीरे यांच्याकडून माथाडी कामगार सेनेचे शहराअध्यक्षपद काढून घेऊन, दुस-या पदाधिका-याला ते पद देण्यात आलं. इतकी घाई कोणाला होती, असा थेट सवाल वसंत मोरे यांनी केला आहे.

(हेही वाचाः पुण्यात राज’सभा’ १३ अटी शर्थींसह)

राज ठाकरे कारवाई करणार?

वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी पुणे मनसेतील अंतर्गत वादांबाबत भाष्य केले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे याची गंभीर दखल घेणार का?, वसंत मोरे यांच्यावर अन्याय करणा-या नेत्यांवर राज ठाकरे कारवाई करणार का, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.