मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले. ज्या दिवशी राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी ४ मे चा अल्टिमेटम दिला, त्यानंतर मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे त्याआधीच तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले आणि चार दिवसांनी परतले. त्यामुळे वसंत मोरे पुन्हा चर्चेत आले. त्यांचा या भोंगा विरोधी आंदोलनाला पाठिंबा नाही, अशी चर्चा सुरु झाली. मात्र आता राज ठाकरे हे शनिवारी, ७ मे रोजी पुण्याच्या दौऱ्यावर आले. त्याआधीच वसंत मोरे यांनी पुण्यात महाआरतीचे आयोजन केले.
कात्रज येथे हनुमान मंदिरात महाआरती
वसंत मोरे यांनी शनिवारी पुण्यात महाआरतीचे आयोजन केले आहे. मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘कात्रजला संध्याकाळी सहा वाजता ऑफिस समोरील हनुमान मंदिरात मी महाआरती करतोय. यावे तर लागतयचं नक्की या मी वाट बघतोय’, असा मजकूर या पोस्टमध्ये लिहला आहे. कात्रज परिसरात या महाआरतीसाठी स्टेज उभारण्यात आले आहे. याशिवाय, बॅनर्स लावून महाआरतीच्या कार्यक्रमाची जाहिरातही करण्यात आली आहे. त्यामुळे आता या महाआरतीच्या मुद्द्यावरून पुण्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या महाआरतीला परवानगीही दिली आहे.
Join Our WhatsApp Community