महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायरब्रॅंड नेते वसंत मोरे हे पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या कामावर नाराज असल्याचे चित्र होते. मात्र प्रत्येक वेळी मी मनसे सोडणार नाही, या मतावर ते ठाम होते. आता त्यांच्या नव्या ट्वीटमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत ट्वीटमधील व्हिडीओतून वसंत मोरेंनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे. वसंत मोरे आणि राज ठाकरे वेगळे होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
वसंत मोरे यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात त्यांनी त्यांचा आणि राज ठाकरेंचा जुना फोटो असलेला बॅनर बाहेर काढल्याचे दिसत आहे. त्यानंतर माझे आणि राज ठाकरे यांचे नाते कसे घट्ट आहे हे देखील व्हिडीओतून सांगितले आहे. त्यांच्या या व्हिडीओतून त्यांनी पक्षातील विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यांच्या या ट्वीटची सध्या पुण्यातील मनसेच्या वर्तुळात चर्चा सुरु आहे.
( हेही वाचा: हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार नाहीच; मुख्यमंत्र्यांकडील खाती अन्य मंत्र्यांकडे )
काय म्हटलंय ट्वीटमध्ये ?
मागच्या महिन्यात एका कार्यक्रमानंतर मांडववाल्याने मा. राजसाहेबांचे आणि माझे मांडवातले 2 उभे बॅनर काढले आणि एकमेकांना समोरासमोर बांधले. आज दुपारी अमितसाहेबांना भेटून आल्यानंतर म्हटले माझ्यावर प्रश्नचिन्ह उभे करणा-यांना उत्तर द्यावे, म्हणून ते बॅनर शोधून काढले आणि म्हटले ते ऑफिसला लावून टाकावेत म्हणजे सर्वांना उत्तरे मिळतील, असे ट्वीट करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
Join Our WhatsApp Communityमागच्या महिन्यात एका कार्यक्रमानंतर मांडववाल्याने मा. राजसाहेबांचे आणि माझे मांडवातले २ उभे बॅनर काढले आणि एकमेकांना समोरासमोर बांधले. आज दुपारी अमितसाहेबांना भेटून आल्यानंतर म्हटलं माझ्यावर प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्यांना उत्तर द्यावे म्हणून ते बॅनर शोधून काढले आणि
१/२#मनसे pic.twitter.com/qBNH37xjiX— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) December 9, 2022