राज ठाकरेंची तब्येत बरी नसल्याने ते वसंत मोरे यांना न भेटताच मुंबईला रवाना झाले. यानंतर राज ठाकरे यांनी वसंत मोरेंची भेट टाळली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. या सगळ्या घडामोडींवर स्वत: वसंत मोरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज ठाकरेंच्या पुण्याच्या सभेला मी माझ्या पद्धतीने जंगी नियोजन करणार असेही त्यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले वसंत मोरे?
राज ठाकरेंची प्रकृती बरी नसल्याने ते घाईघाईत मुंबईला गेले पण पुढच्या वेळी ते मला नक्की भेटतील. माझ्या समस्या मी त्यांच्या कानावर टाकेन, मला विश्वास आहे, माझी नाराजी नक्की दूर होईल असे वसंत मोरे म्हणाले. राज ठाकरेंच्या येत्या २२ मे च्या सभेचे मी जंगी नियोजन माझ्या पद्धतीने करणार आहे. पक्षातील लोकांचीही मला साथ मिळेल. त्यांच्या सभेचं नियोजन भव्य दिव्य करण्याचा मी प्रयत्न करेन असेही वसंत मोरे यांनी सांगितले.
( हेही वाचा : पुण्यात वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांच्यावर गुन्हा दाखल)
राज ठाकरेंची अयोध्या दौऱ्यावर जाण्याआधी पुण्यात सभा होणार आहे. २२ मे रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे राज ठाकरेंची सभा होणार आहे. तत्पूर्वी पायाच्या दुखण्यामुळे राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले पण त्याअगोदर त्यांनी वसंत मोरेंना भेटीची वेळ दिली होती मात्र, तब्येतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांना न भेटताच राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले. यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यावर वसंत मोरेंनी स्पष्टीकरण दिले आहे.
Join Our WhatsApp Community