मनसेचे नेते वंसत मोरे यांच्या मुलाला धमकीचे पत्र; फेसबुक पोस्टही चर्चेत

171

मनसेचे नेते वसंत मोरे यांचा मुलगा वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचे पत्र आल्याने खळबळ माजली आहे. सावध राहा रुपेश अशा आशयाची चिठ्ठी ही रुपेश मोरेंच्या गाडीवर ठेवण्यात आली होती. याची तक्रार भारती विद्यापीठ पोलिसांत केली आहे. ही धमकी कोणी दिली याचा पोलीस शोध घेत आहेत. या धमकीनंतर, वसंत मोरेंनी एक फेसबुक पोस्टही लिहिली आहे.

( हेही वाचा: शालेय विद्यार्थ्यांसाठीची विशेष ‘बेस्ट’सेवा अद्याप बंद )

वसंत मोरेंची पोस्ट

मुलगा म्हटला की प्रत्येक बापाला अभिमान असतो आणि बाप म्हटलं की प्रत्येक पोराचा आयडल असतो.

आमचेही अगदी तसेच आहे, पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही..

राजकारणात काम करत असताना, अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो तेच समजत नाही…

गेले दोन -तीन दिवस झाले बोलू की नको तेच समजत नव्हते,
पण आज ठरवले तुमच्यासोबत बोलायलाच हवे…

साहेबांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणि त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली, त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती, त्यादरम्यान कोणीतरी त्याच्या गाडीच्या वायफरमध्ये

“सावध रहा रुपेश” अशी चिट्ठी लावून ठेवली जी रात्री घरी आल्यावर पाहिली…

तसा तो कोणाच्या अध्यात मध्यात नसतो तरीही असे का? हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय…

आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा. त्यांची कामे करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबाबाबतीत असा विचार करायचा. हे का तेच कळत नाही.

भारती विद्यापीठ पोलीस बाकी तपास करत आहेत…

तू जो कोणी असशील तो पुसट असा कॅमे-यात दिसतोय

बाबा फक्त इतकेच लक्षात ठेव त्याचा बाप
वसंत ( तात्या) मोरे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.