मनसे नेते वसंत मोरेंच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून ३० लाखांची खंडणी अज्ञातांनी मागितली आहे. खंडणी दिली नाहीतर गोळ्या झाडून जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( हेही वाचा : इराणहून आलेल्या बोटीतून तब्बल ४२५ कोटींचे ड्रग्ज जप्त! एटीएस आणि कोस्टगार्डची संयुक्त कारवाई )
नेमके प्रकरण काय ?
वसंत मोरे यांचे सुपुत्र रुपेश मोरे यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अल्पिया शेख या महिलेच्या नावाने मेसेज आला असून यात ३० लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. हे पैसे घेऊन पुण्यातील खरडी येखील युवान आयटी येथे थांबलेल्या कारमध्ये ठेवा असा मेसेज रुपेश मोरे यांना होता. तसेच हे बनावट विवाह सर्टिफिकेट व्हायरल करून जीवे मारण्याची धमकी सुद्धा त्यांना देण्यात आली.
पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वडगाव ग्रामसेवकाच्या सहीचे हे मॅरेज सर्टिफिकेट आहे अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पुण्यासहित छत्रपती संभाजीनगरमध्येही तपास करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community