गुढीपाडव्याच्या सभेत मशिदींवरील भोंग्याच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका घेतली, त्यामुळे मनसेची पुण्यातील प्रमुख वसंत मोरे नाराज झाले. त्यांना पदावरून हटवण्यात आले. त्यामुळे मोरे मनसे सोडणार, अशी चर्चा सुरु झाली, परंतु मोरे यांनी मनसे सोडणार नसल्याची म्हटले. राज ठाकरे यांची ठाण्यात १२ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या सभेनंतर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी उत्तरसभा होणार आहे. त्याआधीच मोरे पुण्यातील कार्यकर्त्यांना भेटत आहे आणि पक्ष सोडायचा की नाही, याची भूमिका ठरवणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याच्या आवाजा विरोधात भूमिका घेतली आणि त्या भोंग्याचा आवाजाच्या दुपटीने हनुमान चालीसा लावावी, असे आदेश मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले. त्यानंतर राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर मनसेचे तत्कालीन शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेच्या अगदी विरोधी भूमिका घेतली. माझ्या प्रभागात मी अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचे भोंगे लावणार नाही’, अशी थेट भूमिका घेतल्यामुळे वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली.
सकाळपासून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी
त्यानंतर वसंत मोरे हे मनसेत राहणार की पक्षबदल करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच वसंत मोरे रविवारी आपल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. आता ही भेट नक्की कशासाठी आहे? असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. कारण नुकतेच वसंत मोरे यांनी आपण कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय कोणताच निर्णय घेत नाहीत, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना भेटून मोरे आपल्या पुढील राजकारणाची दिशा ठरवणार आहेत का?, अशी चर्चा सुरु झाली आहे. वसंत मोरे सकाळपासून आपल्या कात्रज येथील ‘कृष्ण लीला’ या निवासस्थानाच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत.
सोमवारी राज ठाकरेंची भेट घेणार
वसंत मोरे हे सोमवारी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मनसेचे नेते बाबू वागस्कर हे राज ठाकरे यांचा निरोप घेऊन वसंत मोरे यांच्या घरी गेले होते. त्यांनी वसंत मोरे यांना राज ठाकरे यांचा निरोप दिला. राज ठाकरे यांनी सोमवारी तुम्हाला भेटायला बोलावले असल्याचे बाबू वागस्कर यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community