मनसेच्या रडारवर माहीमची मशीद! कारवाई करण्यासाठी पोलिसांना पत्र

128

राज्यातील मशिदींवरील भोंगे खाली उतरावा, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात येईल, असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्यावर राज्य सरकारने आता या विषयाकडे कायद्याच्या दृष्टिकोनातून हाताळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सैनिकही मशिदींच्या विरोधात पोलिसात तक्रारी करू लागले आहेत.

कायद्याच्या दृष्टीने भोंगा आंदोलन सुरु ठेवणार 

मनसेचे दादर विभागाचे प्रमख यशवंत किल्लेदार यांनी मुंबई पोलिसांना पत्र पाठवले. त्यात माहीम विभागातील मशिदींवर संध्याकाळच्यावेळी भोंगे लावून अजान पठण केले जात आहे, अशा तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्या आहेत. या मशिदींवर आधी कारवाई करावी, अशी मागणी किल्लेदार यांनी केली आहे. मनसेकडून याबाबतचे पत्र माहीम पोलीस ठाण्याला देण्यात आले आहे. 4 मे रोजी सकाळी भोंग्यावर अजान झाली नाही. पण संध्याकाळी भोंग्याचा वापर झाला. पुन्हा न्यायालयाच्या निर्देशाची पायमल्ली केली जात आहे. याप्रकरणी काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी मनसेने केली. दरम्यान, राज ठाकरे यांनी सुद्धा अजून काही मशिदींवर अजान  भोंग्यावर होते, असे म्हटले होते. त्यामुळे आता मनसेनेही भोंगा विरोधी आंदोलन कायद्याच्या दृष्टिकोनातून सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मशिदींच्या विरोधात पोलिसांत तक्रारी करण्यात येत आहेत, अशा रीतीने मनसे आता पोलिसांच्या मदतीने मशिदींना टार्गेट करत आहे.  तसेच आता मनसे नेते मशिदींवरील भोंग्यांवर अजान वाजले तर पोलिसांना १०० नंबर डायल करून तक्रार करणार आहे.

(हेही वाचा भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी पवारांचा दावा ठरला खोटा! पोलिसांकडून संभाजी भिडेंना क्लीन चिट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.