महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्याला विक्रमी गर्दी झाली. या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचाही समाचार घेतला. दरम्यान, या सभेआधी मनसेच्या काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना प्रमोशन देण्यात आले. मनसे नेते, सरचिटणीस आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी यावेळी घोषीत करण्यात आल्या. त्यांना राज ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
( हेही वाचा : वीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींना सत्ताधारी आमदारांनी मारले जोडे )
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या १७ वर्षांच्या वाटचालीनंतर हे मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, मनसेचे युवा चेहरे संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि विदर्भातील राजू उंबरकर यांना नेतेपदी बढती देण्यात आली आहे. तर अन्य पाच जणांची मनसेच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
सरचिटणीस पदी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, रस्ता अस्थापनेचे अध्यक्ष योगेश परुळेकर, बाळा शेडगे, गणेश सातपुते, रणजीत शिरोळे यांची निवड करण्यात आली आहे. नाशिकचे पराग क्षिंत्रे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जाहिरात क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेले भरत दाभोळकर यांनीही गुढीपाडवा मेळाव्यात मनसेत प्रवेश केला. येत्या काळात त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, असे कळते.
Join Our WhatsApp Community