फटाके वाजवल्याने मुसलमान वैतागले, मनसेने सुनावले!

163

सध्या दिवाळी सुरु असल्याने सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी सुरु असते, विशेषतः सोमवारी, २४ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन होते, त्यामुळे हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. रात्रीपर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरु होती, अशा वेळी मात्र काही मुसलमानांना ही डोकेदुखी वाटत होती. त्यांनी याविरोधात चक्क पोलिसांकडे तक्रार केली. त्यावर मनसेने जबरदस्त शब्दांत त्या मुसलमानांना सुनावले. ‘तुमची भोंग्यावरील अजान आजही सुरु आहे’, याची आठवण करून दिली.

काय आहे प्रकरण? 

ट्विटरला एका मुस्लीम व्यक्तीने पोलिसांना टॅग करत रात्रीच्या वेळी फटाके वाजत असल्याची तक्रार केली होती. सलमान खान नावाच्या व्यक्तीने रात्रीचे दोन वाजले तरी कांदिवलीतील गणेश नगर येथे फटाके फोडले जात असल्याचे ट्वीट करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. त्यावर मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी याचा ट्विटरवरूनच समाचार घेतला. मनोज चव्हाण यांनी या ट्विटचे स्क्रीनशॉट शेअऱ केले असून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “विचार करा मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल. आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होत आहे. आम्ही रोज फटाके फोडत नाही, मात्र तुमची अजान अजूनही अनेक ठिकाणी भोंग्यावर सुरू आहे. थोडं सहन करा कारण दिवाळी आहे, असे ते म्हणाले.

(हेही वाचा ‘मला तेव्हाच राग येतो जेव्हा…’, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं)

काय म्हणतात मनोज चव्हाण? 

‘ट्विट पाहून माझी तळपायाची आग मस्तकात गेली. देवाच्या नावाखाली वर्षानुवर्ष आम्ही यांचे अजान ऐकत आहोत, आम्ही ते सहन करतोय ना. दिवाळी तर फक्त चार दिवस असते. काल पहिला दिवस असल्याने पहाटे लोक उठणारच. त्यांना इतका त्रास होत असेल तर त्यांच्या अजानचा आम्हाला किती त्रास होतो हे पाहिलं पाहिजे. माझा विषयच हा होता की, जसे हे सगळे एकत्र येतात आणि पोलिसांना ट्वीट करणे वैगेरे गोष्टी करतात. तशाच प्रकारे हिंदूही एकवटणे गरजेचे आहे. आपण एकवटलो तरच प्रत्युत्तर देता येईल, असे चव्हाण म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.